Home Breaking News वैजापूर शिक्षक संघ महिला आघाडीने केला १०१ विधवा महिलांचा सन्मान .

वैजापूर शिक्षक संघ महिला आघाडीने केला १०१ विधवा महिलांचा सन्मान .

0

वैजापूर:  दिनांक २२ जानेवारी २०२२ रोजी म रा प्रा शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष तथा शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन नारायणरावजी साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली तर उपाध्यक्ष राजेश आत्राम व जिल्हासहप्रसिद्धप्रमुख गणेश पगारे यांच्या सहकार्याने शिक्षक संघ महिला आघाडीने सन्मान स्त्री शक्तीचा ,जागर अस्तित्वाचा या कार्यक्रमांतर्गत संक्रातिनिमित्त होणाऱ्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला फाटा देत तालुक्यातील विधवा महिलांचा तृतीय वर्षी सन्मान केला.यामध्ये विधवा सैनिक पत्नी,शिक्षक पत्नी व सर्वसामान्य विधवा महिलांचा सन्मान करून तालुक्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार पत्नी संगीताताई बोरणारे व वर्षाताई बोरनारे तर प्रमुख पाहुणे म्हणून आयटक च्या तालुकाध्यक्षा शालिनी पगारे, समाजसेविका शबाना शेख,चेअरमन पत्नी संगीताताई साळुंके,पं.स.सदस्या माधुरीताई गलांडे ,डी वाय एस पी महक स्वामी,सेवानिवृत्त मुख्याध्यपिका चंद्रकला लहामगे,सैनिक पत्नी रंजनाताई दिवेकर, जयाताई खोकले, पोलीस पाटील हिराबाई दहिटे, ऍडव्होकेट नुझत मॅडम तसेच डॉ दिपाली इंगळे,सरपंच रंजनाताई आहेर ,उपसरपंच वर्षाताई जाधव,उपस्थित होत्या.
प्रत्येक माना-पानाच्या कार्यक्रमापासून विधवा महिला भगिनींना समाजचालीरीतीनुसार डावलले जात असताना मकर संक्रातीच्या निमित्ताने होणाऱ्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमास शिक्षक संघ महिला आघाडीने फाटा देत विधवा महिलांना समाजात मानाचे स्थान निर्माण करून देण्यासाठी विधवांचा सन्मान केला.याप्रसंगी विविध उपस्थित महिला मान्यवरांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमापेक्षा अशा प्रकारचे सामाजिक जनजागृती करणारे व जुन्या चालीरीती मोडीत काढून विधवा स्रियांना ताठ मानेने व मानपान देणारे कार्यक्रम होणे अत्यंत गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.यावेळी महिला आघाडीच्या प्रेमा पानपाटील,स्मिता पानपाटील,प्रमिला खैरे,वनिता दयाटे,मीरा टेके,मंगल सोनवणे,आशा मोरे, छाया उचित,वसुंधरा देवरे, स्मिता शिरोळे, निशिगंधा दलाल, निर्मला भोये,संगीता गोरे,मनिषा गायकवाड,प्रतिभा काकळीज,निता शिंदे, कविता दिघे,नर्मदा आत्राम,आदीनीं परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनिता दयाटे,सूत्रसंचालन मीरा टेके तर आभार स्मिता पानपाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here