मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
नंदुरबार: राज्यातील युती सरकार हे जनसामान्यांचे सरकार असून नागरिकांच्या अपेक्षापूर्तीला प्राधान्य देऊन सरकारची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले.शेतकरी हा केंद्रबिंदू मानून नुकसान भरपाईची मर्यादा शासनाने तीन हेक्टरपर्यत वाढविली. नियमित कर्ज परतफेड करणा-या शेतक-यांना प्रोत्साहनपर रक्कमेचे वाटप सुरू केले, लघुसिंचन योजनांचे वीज बिल प्रति युनिट एक रुपयाने कमी केले, तसेच एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत म्हणून ६ हजार कोटींचे वाटप केले असल्याची माहिती दिली.देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीने मोफत प्रवास सुरू केला. याचा १ कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना लाभ झाल्याची माहितीही दिली.नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने त्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी बोलताना दिली. आदिवासींच्या विविध विकास योजनांच्या अंमलबजावणी करिता ११ हजार १९९ कोटींची तरतूद केली असल्याचे यासमयी स्पष्ट केले. नंदुरबार नगरपरिषदेची राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे प्रलंबित असलेली ७ कोटी २८ लाखांची रक्कम त्वरित देण्याची घोषणा यावेळी बोलताना केली.राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार डॉ.हिना गावीत, खासदार राजेंद्र गावीत, आमदार किशोर दराडे, आमदार चिमणराव पाटील, आमदार काशिराम पावरा, आमदार किशोर पाटील, आमदार मंजुळाताई गावित, आमदार राजेश पाडवी, आमदार शिरीष नाईक, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, धुळ्याचे महापौर प्रदीप कर्पे, नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते
.