नाशिक : नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने अलसंन फाउंडेशन च्या वतीने “उर्जा वाहिनी “या राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली. समाजा मध्ये अनेक व्यक्ती संस्था महिला सक्षमीकरण विषयावर काम करत आहेत .आणि अश्या चालत्या बोलत्या दुर्गांची दखल घेऊन त्यांच्या सामाजिक योगदाना बद्दल त्यांना गौरवीत करण्याचा मानस असल्याचे अलसंन फाउंडेशन चे अध्यक्ष श्री आलम खान यांनी सांगितले. फाउंडेशन च्या नवरात्री विशेष बैठकीत सचिव श्री राजेश गोसावी यांनी याबद्दल मांडणी केली सर्व सदस्यांनी सदर संकल्पनेचे स्वागत केले .या वर्षीचा पुरस्कार नाशिकच्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती गीताताई गायकवाड यांना जाहीर झाला आहे. श्रीमती गीता ताई गायकवाड या महिला सक्षमीकरण व किशोरी समुपदेशन क्षेत्रात गेल्या 18 वर्षे कार्यरत असून त्यांच्या सामाजिक कामा करीता त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे . सन्मान चिन्ह व रोख धनराशी व सन्मानपत्र असे पुरस्काचे स्वरूप असुन लवकरच पुरस्काराने त्यांना सन्मानित केले जाईल.