नाशिक :प्रशांत गिरासे वासोळ
मो.9130040024
वाखारी ता देवळा येथील श्री पिंपळेश्वर महाविद्यालययातील सन 1999 बॅच ची माझी विद्यार्थी मेळावा पत्रकार दादाजी हिरे यांच्या नेतृत्वाखाली मोठया उत्साहात साजरा करण्यात आला२० वर्षानंतर पुन्हा भेट म्हणजे मोठी पर्वणीच होती अशी पाखरे येती स्मुती ठेऊन जाती या स्मुतीला पुन्हा उजाळा देण्यासाठी हि पाखरे परत एकदा श्री पिंपळेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात अवतरली यावेळी उपस्थित शिक्षक एम.एम मोरे सरांची भेट घेतली एवढ्या मोठ्या संखेने उपस्थित असलेले माझी विद्यार्थी बघुन भारावून व गहीवरून गेले यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप शिरसाट सर यांनी केले यावेळी योगश मगर ,गौतम खरे ,अशोक निकम ,राकेश खैरनार, शिवाजी जाधव, नितीन ठाकरे ,संदीप शिंदे, संदीप निकम ,दादाजी गुंजाळ ,गणेश ठाकरे ,मानिक शिरसाठ,हिरालाल देवरे ,मनोज शिंदे ,शरद हेमाडे समाधान गांगुर्डे ,आबा आहेर, विनोद पगार ,नाना अहिरे ,आण्णा जाधव, भाऊसाहेब आहिरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन कौतिक भदाणे व संदीप निकम व भाऊसाहेब आहीरे यांनी आभार व्यक्त केले,