केतकी चितळे या बाईने अपशब्द उच्चरले निखील भामरे याचे समर्थन

0

मनमाड :  ( निलेश व्यवहारे ) दिनांक 14/05/2022 (शनिवार) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, यांच्या बद्दल अभिनेत्री केतकी चितळे या बाईने अपशब्द उच्चरले व निखील भामरे याने त्याचे समर्थन केले हे सर्व कृत्य अतिशय निंदनिय असून यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते ,पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून प्रशासनने त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी अन्यथा मा.श्री.छगन रावजी भुजबळ साहेब याच्या आदेशाने व मा.आमदार पंकज भाऊ भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली या पुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व झालेल्या नुकसानिस प्रशासन जबाबदार राहील असे निवेदन मा.पोलीस निरीक्षक साहेब मनमाड शहर पोलिस स्टेशन याना निवेदन देऊन निषेध करण्यात आला.या वेळेस शहराध्यक्ष दीपक गोगड, से.द.जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव,अ. स. तालुकाध्यक्ष हबीब शेख,महिला अध्यक्षा अपर्णाताई देशमुख, मा.नगराध्यक्ष प्रकाश बोधक, युवक ता.संघटक अमोल गांगुर्डे, युवती अध्यक्षा डॉली निकाळे, युवक कार्याध्यक्षअरविंदकाळे,योगेश(बाळासाहेब)जाधव, बाबा पठाण,नितीन वाघमारे, सुफियांन मिर्झा,अक्षय देशमुख. हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here