चाळीसाव्याचे ख्रिस्ती भजन सुरु होते”नोहा उघड तारुचे दार”राहुलने उघडले तारुच्या घराच्या खिडकीचे दार,कासार पिंपळगावात पुन्हा चोरी, बोकाळली गुन्हेगारी

0

अहमदनगर :  (सुनिल नजन/अहमदनगर)संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे घडली. गावातील वयोवृद्ध शेतकरी साहेबराव रेवजी तिजोरे यांच्या दुखःद निधनानंतर एकुण चाळीसाव्या दिवशी ख्रिस्ती भजन सुरू होते. “जलस्रुष्टिने कइक मेले, किती उघडे घरदार,”नोहा उघड तारुचे दार”हे भजन गल्लीतील राहुल पगारे यांनी ऐकून त्यांनी गल्ली तील ताराचंद दामोदर तिजोरे यांच्या बंद घराची खिडकी उघडून रोख रकमेसह बावीस हजार रुपयांचे दागिने चोरून नेवून फरार झाला आहे. या बाबत घरमालकीन सौ. लताबाई ताराचंद तिजोरे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की मी आणि माझे पती मोलमजुरी साठी घराला कुलूप लावून बाहेर कामाला गेलो होतो.त्या दिवशी माझा नातू सिध्दु अरुण क्षेत्रे हा घरी एकटाच होता. सायंकाळी सहा वाजता कामावरून घरी आलो असता नातू सिध्दु याने सांगितले की मी आपल्या लींबाच्या झाडाखाली खेळत असताना दुपारी तीन वाजन्याच्या सुमारास मला आपल्या घराचे पत्रे वाजल्याचा जोरात मोठ्याने आवाज आला म्हणून मी काय झाले हे पाहण्यासाठी घरी गेलो तेव्हा मला घराची पाठीमागिल खिडकी उघडी दिसली. व घराजवळच राहणारा राहुल बाबासाहेब पगारे रा.कासार पिंपळगाव हा खिडकीतून बाहेर उडी टाकून पळून जाताना दिसला. असे समजताच मी त्यानंतर घराचे कुलूप उघडून घरात जाउन पाहिले असता घरातील कपाटाचा दरवाजा सताड उघडा दिसला. व कपाटातील सामानाची उचका पाचक केलेली दिसली. कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम गायब झालेली दिसली.माझी खात्री झाली की राहुल बाबासाहेब पगारे रा.कासार पिंपळगाव ता.पाथर्डी ,जिल्हा अहमदनगर याने घराच्या पाठीमागिल खिडकीवाटे घरात प्रवेश करून घरातील कपाटाचा दरवाजा चावीने उघडून कपाटातील सोन्याचे दागिने(ओम, मंगळसूत्र, झुंबर,)व रोख रक्कम चोरून नेली आहे.ही फिर्याद सिमोन शामराव तिजोरे यांनी वाचून दाखवली ती बरोबर होती. या बाबत पाथर्डी पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ०४०३/२०२२ कलम ४५४,३८० प्रमाणे राहुल बाबासाहेब पगारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल केल्या नंतर सौ.लताबाई तिजोरे यांनी सांगितले की संशयित आरोपी पगारे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला गावात अनेक साथीदार आहेत. पंचक्रोशीतील अनेक ठिकाणी जाऊन चोऱ्या केलेल्या आहेत.अनेक पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,घरातील लोक ही त्याला चोऱ्या करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत असा आरोप केला आहे. सदर गुन्हेगाराला जिल्ह्यातून तडीपार करावे अशी मागणी करण्यात आली आहे. कासारपिंपळगाव हे अनेक गुन्हेगारांचे माहेरघर बनले आहे. अनेक ठिकाणी जाऊन चोऱ्या केल्यानंतर हे गुन्हेगार मराठी शाळेच्या आवारातील मंदिरात जाऊन मोकाटपणे विश्रांती घेत दहशत निर्माण करीत बसतात.गावात गुन्हेगारी करणाऱ्या लोकांच्या तीन टोळ्या कार्यरत असुन एका टोळीने शेळ्या चोरायच्या,दुसऱ्या टोळीने शेतकऱ्यांचे विजपंप, केबल,पाईप चोरी करायचे व तिसऱ्या टोळीने घरफोड्या करायच्या कासार पिंपळगावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांनी या प्रकरणात वेळीच लक्ष घालावे आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना सांगून गुन्हेगारीचा समुळ नायनाट करण्यासाठी प्रयत्न करावे अशी सर्व सामान्य जनतेची मागणी आहे पाथर्डीच्या पोलिसांनी परीसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कँमेऱ्यात दिसनाऱ्या आणि मोकाट फिरणाऱ्या समाज कंटकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.( स्पेशल क्राईम रिपोर्टर, सुनिल नजन,अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here