आमदार सुहासआण्णा कांदे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्याला मोठे यश.

0

मनमाड : ( प्रतिनिधी – निलेश  व्यवहारे )आमदार मा. सुहासआण्णा कांदे यांनी मनमाड शहराची विकासगंगा ठरू पाहणाऱ्या करंजवन योजनेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांच्याकडे केलेला पाठपुरावा व करंजवन शासकीय समिती मार्फत केलेले प्रामाणिक प्रयत्नाचे फलीत म्हणून मनमाडकरांसाठी स्वप्नवत वाटणारी करंजवन बंद पाईपलाईन योजना 3 मार्च रोजी मंजुरी मिळून प्रत्यक्षात अवतरली. त्यामध्ये 257.15 कोटींची मंजुरी मिळाली होती. तिची वाढीव मंजुरी मिळवण्यासाठी परत त्यासाठी प्रयत्न करून वाढीव निधीनुसार 311.80 कोटीच्या निधीला महाराष्ट्र सुवर्णजयंती नागरोतथान अभियानांतर्गत मंजुरी मिळवण्यासाठी आमदारांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून लवकरच या योजनेचे टेंडर प्रोसेस सुरू होऊन उद्घाटन करणार असल्याचे सुतोवाच आ.सुहासआण्णा कांदे यांनी केले.त्याचबरोबर या योजनेसाठी 15 % टक्के लोकवर्गणी ही नगरपालिकेला अदा करावी लागणार आहे.नगरपरिषेदेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता ती सुद्धा वर्गणी माफ करण्याची मागणी आमदारांनी मुख्यमंत्री मा. उध्दवसाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार व नगरविकास मंत्री मा.एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे केली असता.याबाबतही सहानुभूतीपुर्वक विचार करण्याचे आश्वासन संमंधितांनी आमदार साहेबांना दिल्याने हे एक मोठे यशचं आमदारांच्या प्रयत्नांना मिळाल्याचे व मनमाडकरांना दिलेल्या वचनाची वचनपूर्तीच पूर्ण होत असल्याचा आनंद आमदारांनी व्यक्त केला.ही बातमी शहरात येताच शहरातील जनतेने यासाठी अनेक आशिर्वाद व आभार रुपी भावना आमदार साहेबान प्रती व्यक्त होतांना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here