जि.प. सदस्या डॉ. नूतन आहेर यांना क्षितिजा महिला सन्मान पुरस्कार

0

नाशिक : ( प्रशांत गिरासे वासोळ ) देवळा-(दि.११ जानेवारी) नासिक येथे उमंग महिला फाउंडेशन च्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तबगार महिलांचा क्षितिजा महिला सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. स्वराज्य रक्षक संभाजी राजे मालिकेतील राणू अक्का यांची भूमिका साकारणाऱ्या अश्विनी महांगडे यांच्या हस्ते जिल्हा परिषद सदस्या डॉ. सौ. नूतन सुनील आहेर यांना क्षितिजा महिला सन्मान या पुरस्काराने गौरविण्यात आले, यावेळी बारामती ॲग्रीकल्चरलच्या विश्वस्त सुनंदा पवार या उपस्थित होत्या, महिलारत्न माजी मंत्री पुष्पाताई हिरे, मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या विश्‍वस्त मीनाताई भुजबळ, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांना जीवनगौरव तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंग, सावी फाउंडेशनच्या अध्यक्ष सविता व्होरा, सिल्वर एज युटोपीनच्या अध्यक्ष पिनल वानखेडे, सामाजिक कार्यकर्त्या निना जाधव, सुरेखा भालेराव, डॉ. शीतल गुप्ता आदी मान्यवर महिलांना क्षितिजा महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी उमंग महिला फाऊंडेशनच्या अध्यक्षा विद्या आहेर या उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा वाघ यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here