(अहमदनगर प्रतिनिधी) दशक्रियेच्या दिवशी पिंडदानाच्या वेळी पिंडाला काकस्पर्श (कावळा शिवणे) होतो त्यावेळेस म्रुत आत्मा मोक्षाला गेला अशी अध्यात्मातील लोकांची धारणा आहे.परंतु तो कावळा जर पुर्व दिशेकडून आला आणि पिंडाला शिवला तर म्रुत झालेला आत्मा हा वैकुंठाला गेला समजा,कावळा जर पश्चिमेकडून आला तर स्वर्गाला गेला, कावळा जर दक्षिणेकडून आला तर नरकाला गेला आणि उत्तर दिशेकडून आला तर म्रुत आत्मा हा कैलासाला गेला असे समजावे अशी माहिती जेउर हैबती ता.नेवासा येथील ह.भ.प. अक्षय महाराज उगले यांनी दिली ते अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोपरे गावचे माजी पोलीस पाटील स्व.मळूपाटील बाळाजी उघडे यांच्या चौदाव्या पुंण्यतीथी सोहळ्या निमित्त आयोजित केलेल्या किर्तना प्रसंगी बोलत होते.दोन तास किर्तन सेवेतून महाराजांनी आई वडील यांची महंती सांगून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. आपल्या वर आई वडीलांचे कसे अनंत उपकार आहेत हा विषय सांगत असताना अनेकांना आपले अश्रू अनावर झाले.हुदयस्पर्शी किर्तनातून महाराजांनी अनेक पैलूंना स्पर्श करीत उपस्थितांच्या डोळ्यात झंनझनीत अंजन घालून जन सामांन्याची वैचारीक पातळी उंचावली. यावेळी उगले महाराजांनी स्व.मळूपाटील उघडे यांचे सुपुत्र भाउसाहेब, शिवाजी,आणि बबन उघडे यांच्या या चौदा वर्षातील पित्रू सेवेबद्दल कौतुक केले. महाराजांच्या कीर्तन सेवेसाठी ह.भ.प.नवनाथ महाराज आव्हाड, म्हातारदेव उघडे, गायन अशोक गीर्हे,संगीत संतोष ससे,संदिप शिंगटे,भिवसेन वावरे,भास्कर मुळख,सोमनाथ पाटेकर,यांनी साथ संगत केली. पसायदाना नंतर महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी, एकनाथ आटकर चारुदत्त वाघ, निलेश काजळे,मारुती घुले,संतोष बावणे,संजय बर्डे, दिपक धनवटे, बलभीम दळवी, महेंद्र सोलाट,बाबासाहेब बर्डे, भानुदास आव्हाड, शहादेव खेडकर, काशिनाथ आव्हाड, प्रल्हाद आव्हाड, अशोक आव्हाड, नामदेव आव्हाड, यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक मांन्यवर मांन्यवर उपस्थिती होते. ( प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर )
Home Breaking News दशक्रियेच्या वेळी कावळा पू्र्वेकडून आला तर म्रुत आत्मा वैकुंठाला, पश्चिमेकडून आला तर...