आकरा जूनला सुर्याला खळे पडल्यास त्या वर्षी दुष्काळ पडणार,पण या वर्षीमात्र शेतकरी हाताने विहिरीतील पाणी घेतील इतका पाउस पडेल : हवामानतज्ञ पंजाबराव डख

0

(अहमदनगर प्रतिनिधी) ज्या वर्षी आकरा जूनला सुर्याला खळे पडते त्या वर्षी हमखास दुष्काळ पडतो,परंतु पुढील वर्षी (२०२२)मात्र शेतकरी हाताने विहिरीतील पाणी घेतील असा संदेश प्रसिद्ध परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिला.ते अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आव्हाणे बुद्रुक येथील जयमल्हार क्रुषीअँग्रो सेंटरच्या उदघाटना प्रसंगी बोलत होते. या कार्य क्रमाच्या अध्यक्ष स्थानी शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील हे होते.प्रथम तागड परिवाराच्या वतीने सौ.अनिता तागड आणि सौ सुनंदा तागड यांनी उपस्थित मांन्यवरांचे पंचारती ओवाळून औक्षण केले.आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जयमल्हार क्रुषीअँग्रो सेंटरचे फीत कापून उदघाटन करण्यात आले. उपस्थित मांन्यवरांचा तागड परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ह.भ.प. महादेव महाराज पाचे,निलेश महाराज वाणी, बबनराव भुसारी, उत्तमराव आहेर,अंबादास कळमकर, काकासाहेब नरवडे,सुभाष वाणी, क्रुषीअधिकारी गणेश वाघ,कानिफनाथ मरकड हे उपस्थित होते. प्रारंभी ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय कोळगे यांनी प्रास्ताविक केले. माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी आजच्या शेतकऱ्यांनी नवनवीन क्रुषीतंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेती करावी असा संदेश दिला.पंजाबराव डख म्हणाले की १५ ते ३० मे दरम्यान ज्या गावाला पाउस पडतो त्या गावात संपूर्ण पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाउस पडतो.दरवर्षी २२फेब्रुवारी ते १०मार्चच्या दरम्यान गारपीट होते. डोंगरावर आणि खडकाळ जमिनीवर गारा पडतात. काळपट जमिनीवर गारा पडत नाहीत.पाटबंधारेचा कालव्याच्या आणि नदीच्या दोन्ही बाजूंने एक किलोमीटर अंतरा पर्यंत गारा पडतात. मंदिरावरचे कळस हे विजेला आकर्षून घेतात, पायाळू माणसावर विजपडत नाही तर तांब्याचे कडे हातात घालनारावर विज पडते.१५ते२०मे दरम्यान ज्या भागात पाउस पडतो त्या भागात जास्त प्रमाणात दुपारच्या नंतर विजा पडतात. विजा स्त्रिया ऐवजी पुरुषांवर जास्त प्रमाणात पडतात.गावरान आंब्याचा रस ज्या वर्षी खायला मिळतो त्या वर्षी दुष्काळ पडतो. उन,वारा,वादळ, वावटळ,गारपीट आणि पाउस येण्याची आणि न येण्याची कारणे सांगून हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी नवनाथ तागड,अर्जुन तागड,शिवाजी तागड,आदिनाथ तागड,धर्मा तागड, नानासाहेब तागड,बाळासाहेब तागड,संदिप तागड,नंदू आहेर,महादेव तुतारे,हे उपस्थित होते.शेवटी पंजाबरावांनी गावातील निद्रिस्त गणपतीची पूजा करून दर्शन घेतले.( प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here