पंढरपूर येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमाची जलदगतीने कोर्टात केस चालवून फाशी द्या – एम के एस प्रमुख पी बी कोकरे

0

मुंबई : ( जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७)

मुंबई: महाराष्ट्र क्रांती संघटना प्रमुख श्री पी बी दादा कोकरे यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर यांच्याकडे लेखी निवेदनव्दारे मागणी सोलापूर जिल्ह्यातील पवित्र ठिकाण म्हणून ओळख असणाऱ्या विठुरायाच्या पंढरीत एका गरीब कुटुंबातील धनगर-ओबीसी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर एका नराधमाकडून लगातार सात दिवस बलात्कार करण्यात आला असून पीडित मुलगी ही लहान असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले असता अशा कठीण परिस्थितीत पीडित मुलीची आई घरकाम धुणीभांडी करून आपला उदरनिर्वाह करत होती. त्यातच एका राक्षस वृत्तीच्या भामट्याने नजर ठेवून गरिबीचा फायदा उचलून मुलीला तिच्या घरातून अपहरण करून घेऊन जाऊन सातत्याने तिच्यावर अनेक दिवस बलात्कार करण्यात आला.पीडित मुलीला अपहरण करून ज्या गाडीतून घेऊन जाण्यात आले ती गाडी शासकीय असल्याने कोणाची होती व पीडित मुलीला ठेवण्यात आलेल्या जागेची सखोल चौकशी करून त्या सर्वाना सहआरोपी करून कडक कारवाई करण्यात यावी संबंधीत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या पीडित फिर्यादीला पोलीस स्टेशनमध्ये अनेक कारणे दाखवून बसवून ठेऊन वेळेत गुन्हा दाखल न करून घेणाऱ्या संविधानिक खुर्चीचा अपमान करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास ताबडतोब निलंबित करण्याचे आदेश देण्यात यावे.जोपर्यंत केस चा निकाल जलदगतीने लागत नाही तोपर्यंत पीडित कुटुंबीयांना आरोपी पासून धोका असल्याने पोलीस संरक्षण देण्यात यावे.बलात्कारी भामट्याची जलद गतीने कोर्टात केस चालवून आरोपीला फाशीची शिक्षा होण्याचे आदेश देण्यात यावे अशी लेखी निवेदन व्दारे मागणी एम के एस प्रमुख श्री पी बी दादा कोकरे यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे करून माहितीस्तव प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री विजय वडेट्टीवार साहेब, प्रवीण दरेकर साहेब, किरीट सोमय्या साहेब, संदीप देशपांडे साहेब याना सदर प्रकरण लावून धरून पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याकरिता प्रत पाठविण्यात आली असून पीडित मुलीला न्याय न मिळाल्यास संविधानिक अधिकारानुसार धनगर व ओबीसी समाज राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल याबाबत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला संपूर्ण जबाबदार सरकार व प्रशासन असेल असा इशारा महाराष्ट्र क्रांती संघटना प्रमुख श्री पी बी दादा कोकरे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here