खाजगीकरण चालू आहे ते बंद करण्यात यावे

0

मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे मनमाड दौऱ्यावर असलेले
मा राज्यसभा खासदार संजय राऊत यांना कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे व कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिले.सदर निवेदनात मनमाड केंद्रीय रेल्वे इंजिनिअरिंग कारखानाला कच्चा माल व नवीन वर्कऑडर मिळवण्यासाठी प्रयत्न करावे, रेल्वे मध्ये मोठ्या प्रमाणात खाजगीकरण चालू आहे ते बंद करण्यात यावे यासाठी प्रयत्न करावे, रेल्वे ट्रेंड अॅप्रेटिंस यांना रेल्वे मध्ये सामाविष्ट करण्यात यावे,मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे आधुनिकीकरण करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.शिष्टमंडळात कारखाना शाखा चे संघटक सचिव सागर साळवे, कारखाना शाखा चे संघटक सचिव सचिन इंगळे, कल्याण धिवर, शरद झोंबडं,विनोद खरे आदींचा समावेश होता.निवेदनातील सर्वच मुद्द्यावर सकारात्मक विचार होईल असे आश्वासन यावेळी मा.खासदार संजय राऊत यांनी शिष्टमंडळाला दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here