भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत दादा पाटील यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार,महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७) पुणे: चांदनी चौकातील खड्डे आठ दिवसांत भरुन रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करा, केवळ कारणे देऊ नका, असा कडक इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. दोन दिवसांपूर्वीच आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी चांदनी चौकातील वाहतूक कोंडी संदर्भात प्रत्यक्ष पाहाणी करुन, अधिकाऱ्यांना तातडीने खड्डे बुजवण्याची सूचना केली होती. त्यानंतर बुधवारी रात्री पुन्हा आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी चांदनी चौकातील रस्त्याच्या कामाची पाहाणी केली. यावेळी रस्त्याचे काम समाधानकारक न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.या पाहाणी दौऱ्यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेवक दीपक पोटे, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, किरण दगडे-पाटील, जयंत भावे, नगरसेविका अल्पना वर्पे, डॉ. श्रद्धा प्रभूणे-पाठक, वाहतूक पो.नि. बापू शिंदे, प्रत्यक्ष काम करणाऱ्या कंत्राटदाराचे प्रतिनिधी श्रीनिवासन, भाजपाचे कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, गणेश वर्पे, बाळासाहेब टेमकर, सचिन पवार, वैभव मुरकुटे आदी उपस्थित होते.रस्त्याच्या पाहाणीनंतर माध्यमांशी बोलताना श्री पाटील म्हणाले की, चांदनी चौकातील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी चार दिवसांपूर्वीच रस्त्याची प्रत्यक्ष पाहाणी करुन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यावेळी चार प्रमुख मागण्या केल्या होत्या. त्यात प्रामुख्याने रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत ही प्रमुख मागणी होती. त्याचबरोबर मुळशी वरून चांदनी चौकात येताना रस्त्यावर असलेले पत्रे थोडे मागे सरकावून अतिरिक्त लेन तयार करणे, जेणेकरून वाहतूक सुकर होईल. त्याशिवाय सर्व्हिस रस्ते डागडुजी करून तातडीने करणे आणि बावधनकडून येणारी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी 25 ट्रॅफिक वार्डनची तातडीने नियुक्ती करणे आदींचा समावेश होता. त्यापैकी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले होते.ते पुढे म्हणाले की, रस्त्याचे काम योग्य पद्धतीने झाले की नाही, याची पाहाणी करणार असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार आज सदर ठिकाणची पाहाणी केली. मात्र, तरीही रस्त्याचे काम अपूर्ण असल्याचे निर्दर्शनास आले. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, माननीय राज्यपालांचा दौरा आणि देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनामुळे कामास विलंब झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही दोन्ही कारणे रास्त असल्याने पुढील आठ दिवसांत रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, कोणत्याही प्रकारची कारणे देऊ नयेत, असे स्पष्ट केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.श्री. पाटील पुढे म्हणाले की, सदर रस्ता तीव्र उताराचा आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता जास्त आहे. त्यामुळे यावर मार्ग काढण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. तसेच रस्त्याचे काम जोपर्यंत सुस्थितीत होत नाही, तोपर्यंत अतिशय बारकाईने याचा पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना चॉकलेट देऊन त्यांना चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. अधिकारी कर्मचारी चुकले किंवा त्यांनी नीट काम केले नाही की, आपण त्यांना फैलावर घेतो, पण जर चांगले काम केले; तर त्यांचे कौतुक देखील केले पाहिजे असेही ते म्हणाले. चंद्रकांतदादांनी सुचविलेल्या उपाययोजना येत्या आठ दिवसात अंमलात आणू, असे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here