व्यगचित्रातुन शेतकऱ्यांच्या कांद्याच्या कमी असलेल्या दराकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

0

देवळा | प्रशांत गिरासे: शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कांद्याचा बाजारभाव दिवसेंदिवस वाढायला पाहिजे होता, पण तो एकाच जागी स्थिर झाला आहे, तसेच उत्तर महाराष्ट्रात पाऊसही थांबला असुन शेतकऱ्यांना आपल्या कुटुंबाची उपजीविका भागविण्यासाठी, आपल्यावर असलेले कर्ज फेडण्यासाठी, पुढील पिकांच्या नियोजनासाठी तसेच आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी भरपूर प्रमाणात पैसा लागतो, रासायनिक खते, औषधे तसेच इंधनाचे दरही गगणाला पोहोचले असून त्यामानाने सर्वच शेतीमालाला तुटपुंज्या बाजारभाव मिळत आहे. आपल्या गरजा भागविण्यासाठी शेतकरी राजाला तो पैसा फक्त आपल्या कांदा पिकातुनचं मिळत असतो. पण कांद्याचे भाव स्थिर होऊन बसल्याने तसेच मागिल वर्षी बोगस बियाणात फसवणूक झाल्याने कांदा प्रचंड प्रमाणात खराब होत आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याचे दर वाढण्यासाठी सरकारने निर्यात सक्षम करूण योग्य पावले उचलण्यासाठी व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बागलाण तालुक्यातील शेतकरी तसेच तसेच व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी व्यंगचित्र रेखाटुन सरकार जरा आमच्या शेतकरी राजाकडेही लक्ष असु द्या असं मार्मिक व्यंगचित्र रेखाटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here