1 ते 7 ऑगस्ट स्तनपान सप्ताह

0

मनमाड: नमस्कार,🙏मी अन्नपूर्णा जगदीश अडसुळे,बालविकास प्रक्रल्प नाशिक नागरी- 2 आज मी गरोदर महिला,स्तनदा माता यांना स्तनपान विषयी मार्गदर्शन करणार आहे.1ते7 ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह म्हणुन सर्वत्र राबवला जातो. अजुनही स्तनपाना बद्दल काहि गैरसमज समाजा मधें आहेत ते दुर व्हावे म्हणून हा छोटा प्रयत्न.बाळ जन्माला आल्या बरोबर अर्ध्या तासात मातेने बाळाला स्तनपान देणे गरजेचे आहे.आईचे पहिले घट्ट चिकाचे दुध ही बाळाची पहिली लस आहे.आणि ते दुध बाळाची रोगप्रतिकार शक्ति वाढवन्यास मदत करते. *आईला स्तनपानचे अनेक फायदे आहे*. ,1स्तनपान मुळे बाळात व आई मधें मातृप्रेम,जिव्हाळा निर्माण होतो.2स्तनपान मुळे आईला दुसऱ्या गर्भधारणा मधें अंतर ठेवण्यात मदत होते.3 स्तनपान मुळे प्रसरन झालेली गर्भपिशवी अकुंचन होण्यास मदत होते.4स्तनपान मुळे स्तनात दुधाच्या गाठी होत नाही. स्तनपान चे बाळाला होणारे फायदे* 1बाळाच्या मेंदुचा योग्य प्रकारे विकास होतो.2आईच दुध बाळाला सहज पचन्यायोग्य असते.3बाळाची रोगप्रतिकार शक्ति वाढवते.4 बाळाला हवे तेव्हा व जितकी भुक आहे तितक्या प्रमाणात मिळते. 5आई प्रमाणे बाळातही मातृप्रेम निर्माण होते.6आईचे दुध बाळाला सुदृढ व निरोगी ठेवते.म्हणुन बाळ जन्माला आल्या पासुन अर्ध्या तासात स्तनपान सुरु करावे,सहा महिन्या पर्यंत निव्वळ स्तनपान अवश्य आहे.व सहा महीने ते 2 वर्षा पर्यंत स्तनपान सोबत वरचा पुरक आहार देखील. धन्यवाद🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here