देवळा येथील शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीने कोकणातील महाड येथील पुरग्रस्तांना मदतीचा आधार देण्यात आला

0

वासोळ ( प्रतिनिधी प्रशांत गिरासे ,मो.9130040024) मागील महिन्यामध्ये कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे महाड-माणगाव-चिपळून यासह इतर भागात दरडी कोसळल्या, अनेक गाव पुराखाली गेली, अनेक लोक बेघर झाले,त्या पुराचा फटका इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात बसला की कित्येक लोक मृत्युमुखी पडले अशावेळी राज्यातून अनेक संस्थांनी पूरग्रस्त भागाला मदतीचा आधार दिला त्यात शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट ही संस्था अग्रगण्य आहे, महाड तालुक्यातील कांगोरीगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या मोहोद गावी दरड कोसळली आणि अनेक घरांचं नुकसान झालं, गावकऱ्यांना किराणामाल,पिण्याचे पाणी यासह इतर जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड तुटवडा निर्माण झाला आणि हीच गरज लक्षात घेऊन शिवनिश्चलच्या माध्यमातून या गावातील प्रत्येक घराला 15 दिवस पुरेल इतका किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले,ट्रस्टचे अध्यक्ष शिवचरित्रकार यशवंत गोसावी हे स्वतः दोन दिवस त्या भागात मुक्कामाला होते प्रत्येक कुटुंबाला मदत आणि कुटुंबातील मुलांना शैक्षणिक साहित्य अशी मदत संस्थेच्या वतीने करण्यात आली,त्यावेळी विनीत विजयराघवन,सागर रहाणे, सचिन काटे, आदर्श पवार, परेश उत्तेकर, अक्षय बनसोडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवनिश्चल ट्रस्ट व किसान युवा क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here