
येवला: शहरातील मुक्तीभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष उर्मिलाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत महिला व तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महिला मेळावा संपन्न झाला.नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदी रेखा साबळे तर नाशिक जिल्हा संघटक पदी शबनम सलीम शेख तसेच येवला शहराध्यक्ष पदी संगीता साबळे यांची सर्वानुमते निवड करून पत्र देण्यात आले.महिला आघाडीची तालुका कार्यकारणी नव्याने उभारूने तसेच आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा आढावाही या निमित्ताने घेण्यात आला , लॉकडाऊन नंतर कार्यकर्त्यांना पुन्हा नव्याने ऊर्जा देण्याच्या दृष्टीने गाव तिथे शाखा ,जुन्या शाखा व कार्यकरणीचे आवश्यक असल्यास फेरबदल करून नवीन कार्यकारणीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचा झंझावात निर्माण करण्याचा निर्धार करण्यात आला.आजच्या मेळाव्यात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष येवला तालुका सचिव शशिकांत जगताप,वसंत घोडेराव,हरिभाऊ अहिरे यांनी जाहीररीत्या वंचितमध्ये प्रवेश घेतला.याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष उर्मिलाताई गायकवाड,जिल्हा महासचिव पंडित नेटावटे,नाशिक तालुका अध्यक्ष रामभाऊ निकम,नाशिक जिल्हा सचिव बाळासाहेब जाधव,जिल्हा नेते दीपक भंडारी,भारिप चे येवला तालुकाध्यक्ष भाऊसाहेब अहिरे,संजय पगारे,जितेश पगारे,भाऊसाहेब जाधव,चंद्रकांत साबरे, भगवान साबळे,दीपक गरुड,भानुदास पठारे,पोपट खंडांगळे,संदीप जोंधळे,किरण पठारे,संतोष खरे, प्रभाकर गरुड,शिवाजी शिंगाडे,दयानंद जाधव,ज्योती साबळे,शहानज शहा,राधा साबळे,सविता मोरे,बेबी ठाकरे,रुपाली साबळे आदीं सह महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.
