कष्टकरी महिलांच्या मुलांसाठी खेळघर सुविधेसाठी सर्वतोपरी मदत – आ. चंद्रकांतदादा पाटील

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७,कष्टकरी महिलांच्या मुलांसाठी खेळघरचा पायलट प्रोजेक्ट तुम्ही सुरु करा त्यासाठी लागणारा सर्व निधी मी व्यक्तिशः सी एस.आर च्या माध्यमातून उपलब्ध करेन असे भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. कष्टकरी महिलांच्या मुलांसाठी खेळघर सुविधा उपलब्ध करावी ह्या मागणीसाठी कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतच्या पूर्णिमा चिकरमाने, सारिका क्षीरसागर, आशा जगधने, झरीना शेख, सायली प्रदीप यांनी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह आज आमदार चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली त्यावेळी चंद्रकांतदादा बोलत होते. जागतिक बालमजुरी विरोधी दिनी कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीने कष्टकरी पालकांसोबत जोखमीच्या ठिकाणी काम करणाऱ्या मुलांची स्थिती कोव्हीड काळात बिकट झाली होती असे केकेपीकेपी ने केलेल्या सर्वेक्षणानुसार निदर्शनास आले होते. त्यास अनुसरून ह्या मुलांसाठी काय करता येईल ह्याचा अहवाल तयार करण्यात आला. ( सोबत मागणी पत्र जोडले आहे ) त्यानुसार आज आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या समवेत विस्तृत चर्चा करण्यात आली. ह्या चर्चेनंतर आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी पायलट प्रोजेक्ट ची कल्पना मांडली व त्यानुसार कालांतराने असे खेळघर शहर भर उभारण्याबाबत सकारात्मकता दर्शविली. कष्टकरी वर्गाच्या विविध संघटनांशी चर्चा करून पायलट प्रोजेक्ट चा प्रस्ताव सादर करू असे पुर्णिमाताई चिकरमाने व सायली प्रदीप यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here