कलावंतांच्या संचात अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्यावतीने रक्तदान शिबिर सोहळा यशस्वीरित्या संपन्न.

0

मुंबई-दादर-नायगाव प्रतिनिधी: सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जागोजागी रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. प्लाझमा ची आवश्यकता भासू लागू लागली आहे. अशा परिस्थितीत रक्त पुरवठा ही काळाची गरज बनली आहे.ही गरज ओळखून अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने नायगाव, दादर येथे नुकतंच रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आलं होतं. या शिबिरात अनेक कलावंत, तंत्रज्ञ, स्थानिक रहिवाशी तसेच महामंडळाचे पदाधिकारी यांनी सहभागी होऊन रक्तदान केलं. तद्प्रसंगी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता निर्माता महामंडळाचे प्रमुख पदाधिकारी किशोर केदार, बाळासाहेब गोरे, महेश्वर तेटांबे, राजेंद्र बोडारे, राजु शेवाळे, सजंय कांबळे, सतशील मेश्राम, सुभाष कांबळे, देवेंद्र खलसे, श्रीधर कांबळे, मनिष व्हटकर, गणेश पिल्लाई, अजित इंगळे, विनोद डावरे आदी सभासद या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले. शिबिर अंती महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मोरे यांनी सर्व रक्तदाते आणि स्थानिक रहिवाशी तसेच के.ई.एम हॉस्पिटलचे डॉक्टर, परिचारिका, रक्तपेढी संकलक यांचे आभार मानले.धन्यवाद,देवेंद्र मोरे,अध्यक्ष,अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here