
वासोळ ता.देवळा येथे नागरिक विविध समस्यांनी त्रस्त झाले आहेत मात्र ग्रामपंचायत प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे.गावातील विजेच्या खांब्यावरचे ठिकठिकाणचे बल्ब उडून गेले असून नागरिकांना बाहेर अंधारातून ये – जा करावी लागत आहे.याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडून उडवाउडवीचे उत्तरे देखील मिळत आहेत. गिरणा नदीला आवर्तन सोडून तब्बल एक महिना उजाडला असून देखील गावाला जलपरीचे अर्थात बोरीचे पाणी पिण्यासाठी देण्यात येत आहे.बोरिचे पाणी क्षारयुक्त असल्याने नागरिकांना विविध आजारांनी ग्रासले आहे. गिरणा नदिपात्राचे पाणी ग्रामपंचायत पिण्यासाठी कधी देईल नागरिक प्रतीक्षेत आहे ग्रामपंचायतीने गाव वाऱ्यावर सोडले का असा सवाल सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे,
