घेतली बरं का…..!

0

मुंबई – घेतली बरं का…..लस…. हो, तेच सांगतो मी. अनेकांनी खूप आग्रह केला. फोन करून सांगितले, गर्दीत असतोस, सगळीकडे वावरतोस. तू आधी लस घे पाहू.
मग काय तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाला मान देवून महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रहेजा मुजावर जी यांच्या मार्गदर्शनाखाली ओएनजीसी आरोग्य केंद्रात जावून स्टाफ नर्स उज्वला भिसे यांच्याकडून कोविशिल्ड लसचा पहिला डोस घेतला.ओएनजीसी आरोग्य केंद्राचे उत्तम नियोजन दृष्टीस पडले. लाभार्थ्यांना ताटकळत न ठेवता आसनव्यवस्थाही उत्तम होती. संपूर्ण कर्मचारी वर्ग उत्तम मार्गदर्शन करतात. कुठेही गोंधळ-गडबड नाही. त्यामुळे रांगेत जावून सर्वसामान्यपणे लस घेण्याचा वेगळा आनंद घेतला. महापालिकेच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र सुरू आहे.धन्यवाद महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here