उपजिल्हा रुग्णालयासाठी शिवसेनेतर्फे मोफत अँब्युलन्स सुविधा

0

मनमाड – नांदगांव तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आमदार सुहासआण्णा कांदे यांचे विशेष प्रयत्नातून उपजिल्हा रुग्णालय मनमाड येथे मंजूर करण्यात आलेले तीस बेड चे कोविड सेंटर आज पासुन रूग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज झाले असुन आमदारांच्या उपस्थितीत सदर सेंटर रूग्णांक्या सेवेसाठी खुले करण्यात आले आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयासाठी शिवसेनेतर्फे मोफत अँब्युलन्स सुविधा पुरविण्यात येणार असून यावेळी अँब्युलन्सचेही लोकार्पण करण्यात आले. या कोविड सेंटरमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या रूग्णांची हेळसांड होवू नये यासाठी रूग्णांना लागणाऱ्या चादर, बेडशिट, उषा यांसारख्या इतर सर्व सुविधा आमदारांतर्फे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.यावेळी नगरसेवक गणेश धात्रक, साईनाथ गिडगे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद, शिवसेना मनमाड शहर प्रमुख मयुर बोरसे, बबलु पाटील, रविंद्र घोडेस्वार, ॲड. सुधाकर मोरे, राजाभाऊ भाबड, मनमाड मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे, मनमाड पोलीस निरीक्षक श्री. गिते, मनमाड वैद्यकीय अधिक्षक डॉ.निरभवने, युवा सेना जिल्हा प्रमुख फरहानदादा खान, तालुका प्रमुख,किरण देवरे, प्रमोद भाबड तसेच महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here