धुळगाव येथील भिम नगर व खंडेराव नगर मधील स्ट्रीट लाईट कामाची चौकशी करण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे गट विकास अधिकार्‍यांना निवेदन

0

येवला – धुळगाव येथील भिम नगर व खंडेराव नगर मधील स्ट्रीट लाईट कामाची चौकशी करण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे गट विकास अधिकार्‍यांना निवेदन,येवला तालुक्यातील धुळगावं येथील प्रभाग भीम नगर व खंडेराव नगर या ठिकाणी समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत ग्रामपंचायत वतीने नव बौद्ध घटकांचा विकास म्हणून या ठिकाणी स्ट्रीट लाईट पथदीप लावण्यासाठी समाज कल्याण विभागाकडून 750000 रुपये निधी मंजूर होऊन स्ट्रीटलाइट बसवण्यात आले परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे मटेरियल पाईप ,मरक्यूरी ,स्विच हे मटेरियल अंदाज पत्रकाप्रमाणे न वापरता कमकुवत व निकृष्ट काम केलेले आहे हे काम जुलै 2020 मध्ये केले तेव्हापासूनच काही लाईट बंद तर काही चालू म्हणून या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे दिसून आल्याने स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या कामाची चौकशी करण्यात यावी म्हणून गट विकास अधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आल्या असून या कामाची चौकशी न झाल्यास स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका सचिव शशिकांत जगताप नवनाथ पगारे आकाश घोडेराव संदीप गायकवाड तुळशीराम जगताप उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here