मनमाड शहर पत्रकार संघ (रजि) वतीने ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0

मनमाड  – मनमाड शहर पत्रकार संघ (रजि) वतीने ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला . या प्रसंगी संघाच्या प्रथेप्रमाणे संविधानाचे पूजन करण्यात आले . माजी नगरसेवक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संतोष बळीद यांच्या हस्ते संविधान पूजन करण्यात आले . पत्रकार संघाचे अध्यक्ष आझाद आव्हाड यांनी प्रजासत्ताकाचे व संविधानाचे महत्त्व सांगणारे मनोगत व्यक्त केले .या प्रसंगी सेंट्रल रेल्वे मजदूर संघचे महेंद्र चौथमल, नितिन पवार , गणेश हाडपे, पप्पू शिगांरे, राजेंद्र निरभवणे, योगेश म्हस्के, अजहर शेख, आदिसह शैक्षणिक, सामाजिक, राजकिय क्षेत्रातील मान्यवरांसह मनमाड शहर पत्रकार संघाचे सदस्य अशोक बिदरी, सतीश परदेशी, बाळासाहेब आहिरे, हर्षद गर्देविनोद वर्मा, सागर भावसार उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here