शील्ड पुरस्कार

0

नांदगाव – 15 ऑगस्ट रोजी नांदगांव शहरातील हुतात्मा स्मारका चे उदघाटन विर पिता, विर पत्नी तसेच पत्रकार संजीव धामणे व तालुक्याचे आमदार सुहास (आण्णा) कांदे यांचे शुभ हस्ते करण्यात आले.
तसेच ग्रामीण रुग्णालय नांदगांव येथिल वैद्यकीय अधिक्षक डॉ रोहन बोरसे यांनी कोरोना प्रादुर्भाव कालावधीत उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल आमदार सुहास (आण्णा) कांदे यांनी “शील्ड पुरस्कार” देऊन त्यांचा सन्मान केला.
यावेळी बापुसाहेब कवडे तहसीलदार कुलकर्णी, पोलिस निरिक्षक मुटकुळे, गट विकास अधिकारी चौधरी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक बोरसे, नगराध्यक्ष राजेश कवडे, पंचायत समिति सभापती भाऊसाहेब हिरे, शिवसेना तालुका प्रमुख किरण देवरे, शहर प्रमुख सुनिल जाधव, प्रमोद भाबड, तालुक्यातील माजी सैनिक, पत्रकार बांधव, जेष्ठ नागरिक, सुमित सोनवणे, सुमित गुप्ता आदींसह नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here