
मनमाड – सागर गरुड यांच्या वाढदिवसानिमित्त हेमंत सांगळे यांच्या कडून एड्स केअर सेंटर ला ३१००रू मदतनिधी ” ऑल इडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाइज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडल चे कार्यकर्ते व वेल्डिंग चे कर्मचारी आयु. सागरभाऊ गरूड यांची ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा उपाध्यक्ष निवड झाल्याबद्दल व वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा व वेल्डिंग विभागा तर्फे सरकार करण्यात आला.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आयु.सतिषभाउ केदारे (अति.झोनल सचिव) ,आयु.प्रविण आहीरे (सचिव कारखाना शाखा), आयु.विजय गेडाम (खजिनदार, कारखाना शाखा), आयु.रमेश पगारे (अति.सचिव कारखाना शाखा), आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु.श्रीनिवाश ठोंबरे (SSCवेल्डिग विभाग) हे होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सागरभाउ गरुड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वेल्डिंग विभागातील कर्मचारी आयु.हेमंतभाऊ सांगळे यांनी ३,१००रू एड्स केअर सेंटर, मनमाड या संस्थेला मदतनिधी सागरभाउ गरुड यांच्या वाढदिवसानिमित्त दिली.यावेळी सतिष केदारे, श्रीनिवास ठोंबरे, सिध्दार्थ जोगदंड, हेमंत सांगळे,सत्कारमुर्ती सागर गरूड आदी चे भाषण झाले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सचिन इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद खरे यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन या धनंजय घोडके,राहुल शिंदे,प्रेमदिप खडताळे, किरण अहिरे,वैभव कापडे, रविंद्र कागे,हर्षद सुर्यवंशी,राकेश ताठे,किरण वाघ, विलास कराड नंदु कदम,गणपत गायकवाड,बाळु अहिरे,किरण वनिस,किरण वाघचौरे,रोहित भोसले, सुभाष जगताप,प्रभाकर निकम, विनोद खरे,नवनाथ जगताप,सागर सानप,प्रकाश दाडगेआदी ने केले.
