आज पासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सुरू होणार

0

मुंबई : सरकारने येत्या ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतानाच काही प्रमाणात शिथिलताही देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार आज ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. मात्र मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील सिनेमागृह, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट सुरु ठेवण्यास परवानगी दिलेली नसल्याने ते बंदच राहणार आहेत. यापूर्वी दुचाकीवर केवळ एकाच व्यक्तीला प्रवासाची परवानगी देण्यात आली होती.आता नव्या नियमानुसार  आजपासून दुचाकीवर डबल सीट प्रवास करता येणार आहे.राज्यातील लॉकडाऊन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला असला तरी राज्य सरकाने अनेक सवलती जाहीर केल्या आहेत.त्यानुसार राज्यात आजपासून मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स सुरु करता येणार आहे. मात्र मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील सिनेमागृह, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट सुरु ठेवण्यास  परवानगी दिली नाही.होम डिलिव्हरी करण्यासाठी फूड कोर्ट आणि रेस्टॉरंटला किचन सुरु ठेवता येणार आहे.ज्या खेळांमध्ये संघाची आवश्यकता नाही म्हणजेच मल्लखांब, बॅडमिंटन, टेनिस, जीम गोल्फ अशा खेळांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच यापुढे दिचाकीवरून दोन व्यक्तींना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्यात काय सुरु काय बंद राहणार५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत मॉल आणि मार्केट सुरु होणारमॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स पुन्हा सुरु करण्यास परवानगीज्या खेळांमध्ये संघाची आवश्यकता नसते अशा आऊटडोअर खेळ (मल्लखांब, बॅडमिंटन, टेनिस, जीम) परवानगीमॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट बंदच राहणारसध्या सुरु असलेल्या सर्व कंपन्यांना सुरु राहण्यास परवानगी अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकान पूर्वीप्रमाणेच सुरु राहणारटॅक्सी, कॅब,चारचाकी वाहनामध्ये केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक आणि ३ प्रवाशांना प्रवासाची परवानगी रिक्षा मध्ये पूर्वी प्रमाणेच चालक आणि २ प्रवाशांना प्रवास करता येणार आहे .दुचाकीवर चालक आणि एक प्रवासी असा प्रवास करता येईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here