- मनमाड – येथुन जवळच असलेल्या नागापूर येथील शेकडो वर्ष पुरातन असलेल्या नागेश्वर महादेव मंदिरामध्ये यंदाच्या वर्षी श्रावण महिण्यात भरणारी यात्रा कोरोना विषाणूच्या प्रसारा मुळे मंदिर समिती द्वारे रद्द करण्यात आल्याने आजच्या श्रावणातील पहिल्या सोमवारी मंदिर परिसरामध्ये शुक शुकाट बघायला मिळाला. दर वर्षी हजारो भाविक हे नागेश्वर महादेव मंदिरा मध्ये श्रावण महिण्यात दर्शनासाठी येत असतात , या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सम्पूर्ण महिनाभर यात्रा भरत असते.नागेश्वर महादेव मंदिर हे शेकडो वर्ष पुरातन असून जागृत देवस्थान मान्यात येते. मंदिराच्या शेजारी एक कुंड असुन मंदिरामध्ये पिंडी जवळ सतत पाणी भरलेले असते. मंदिरातील पुजारी सांगतात कि त्यांना नेहेमी नागेश्वर महाराजांचे दर्शन हे सतत नागाच्या रुपात होत असते कधी मंदिर परिसरात तर कधी मंदिरातील पिंडीवर देखील नागाच्या रुपात नागेश्वर महादेवांचे दर्शन होत असते. मंदिर परिसरात श्री गणपती , श्री मारुती , श्री शनिदेव ,श्री दत्त मंदिर अशी इतर देवतांची देखील मंदिरे आहे.