मालेगाव येथे शांतता कमिटीची बैठक

0

दिनांक ०१/०८/२०२० रोजी साजरी होणारी बकरी ईद सणाच्या अनुषंगाने आज दिनांक २२/०८/२०२० रोजी १७.०० ते १८.०० वाजे पावेतो मा.पोलीस अधीक्षक डॉ . आरती सिंह मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुसंवाद हॉल मालेगाव येथे , मालेगाव शहरातील मुस्लीम बांधव व प्रतिष्ठीत नागरिक , शांतता समितीचे सदस्य यांची सामाजिक अंतर ठेवुन बैठक घेण्यात आली . सदर बैठकीत मा.पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह मॅडम यांनी सांगीतले की , दिनांक ०१/०८/२०२० रोजी मुस्लीम बांधवांचा बकरी ईद सण साजरा करण्यात येत आहे . कोरोना आजाराच्या कालावधीत मालेगाव शहर खुप अडचणीत आले होते . परंतु मालेगाव शहराने कमी कालावधीत या आजारावर मात केली . आज मालेगाव शहराचे नाव देशपातळीवर गाजले आहे . कोरोना काळात सर्वांनी खुप मेहनत खेतली व प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे सर्वांनी पालन केले . मालेगाव शहरात पॉवरलुम कारखाने सुरू झाले . रमजान काळात मुस्लीम समाजाने प्रशासनास खुप सहकार्य केले आहे . मालेगावचे आमदार यांनी कोरोना , शब्बे – ए – बारात , रमजान ईद या काळात प्रशासनास खुप चांगल्या प्रकारे सहकार्य केले आहे . तसेच येणा – या बकरी ईद सणामध्ये देखील अशाच प्रकारचे सहकार्य करावे , सर्वानी बकरी ईद सण आनदाने साजरा करावा , शासन निर्णयाप्रमाणे कुर्बानी करण्याचे आदेश असल्याने शासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणीच कुर्बानी करावी . घरीच नमाज अदा करावी.ज्या जनावरांबाबत कुर्बानी करण्याचे शासनाचे आदेश आहेत त्याच जनावरांची कुर्बानी करावी . जनावरे वाहतुक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व कोरोना कालीवधीत जे सहकार्य प्रशासनास केले आहे तसेच सहकार्य बकरी ईद सणाच्या दिवशी करण्यात यावे असे आवाहन मा.पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह मॅडम यांनी केले आहे . तसेच मा.जिल्हाधिकारी श्री.सुरज मांढरे यांनी सांगीतले की , शांतता कमिटीची बैठक विशेष करून शहरात कायदा व सुव्यावस्था निर्माण झाल्यास होते . परंतु कोरोना आजाराने आम्हाला एकत्रीत आणले आहे.कोरोना आजारावर मालेगाव शहरवासीयांनी खुप मोठया आवाहनाला सामोरे जावुन या आजारावर मात केली आहे.मुरलीम धर्मगुरू यांना विश्वासात घेवुन शासनाने बकरी ईद सणावर निर्णय घेतले आहेत . शासन सांगत नाही की , सण साजरा करू नका.परंतु कोरोना आजारापासुन वाचण्यासाठी मास्कवापरणे , सुरक्षित अंतर ठेवणे , गर्दी न करणे हया गोष्टीवर गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.प्रशासनाकडुन सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल.म.न.पा , विदयुत विभाग आपआपली जबाबदारी पार पाडतील . तसेच कोरोना आजारापासुन मालेगाव शहरास मुक्ती मिळाल्याने हा आजार चुकुनही पुन्हा आपल्याकडे येवु नये म्हणुन सर्व मालेगाव शहरातील नागरिकांनी दक्ष राहावे असे आवाहन करण्यात आले . तसेच आमदार मुफती इस्माईल यांनी सांगीतले की , कुर्बानी करणे हे इस्लाम धर्मामध्ये अल्लाचा आदेश आहे.यात कोणाचे मन दुखवावे याचा मुळीच हेतु नाही . कुर्बानी फक्त ज्याच्याकडे खुप पैसा अहे तेच लोक करतात . इस्लाम धर्मामध्ये दिखावा करण्यास मनाई आहे.कुर्बानी ही एक धार्मीक बाब आहे . शासनाने केलेल्या मार्गर्शनाप्रमाणे आम्ही आज पावेतो प्रशासनास सहकार्य करित आलो आहोत व यापुढे देखील आमचे सहकार्य राहील . पोलीस प्रशासनाने देखील सदर सण साजरा करण्यासाठी कायदयाच्या चौकटीत राहुनच आम्हाला सहकार्य करावे असे त्यांनी सांगीतले . तसेच शांतता समितीचे सदस्य शफिक राणा , केवळ आप्पा , युसुफ इलियास , अल्ताब बाबा , हरिप्रसाद गुप्ता , सुनिल चांगरे , प्रकाश चंदन , डॉ.पाटील यांनी बकरी ईदच्या अनुषंगाने अडीअडचणी बाबत विविध विभागाच्या अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता संबधित विभागाच्या अधिकारी यांनी अडचणी सोडविण्याचे अश्वासन दिले . सदर बैठकीस मा.पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह मॅडम , मा.जिल्हाधिकारी श्री.सुरज मांढरे , आमदार मुफती इस्माईल , मा.अपर पोलीस अधीक्षक , मालेगाव , उप विभागीय पोलीस अधिकारी शहर / कॅम्प उप विभाग मालेगाव , तहसिलदार मालेगाव , प्रांत मालेगाव , मनपाचे सर्व सबंधित अधिकारी व सर्व संबधित पोस्टे / शाखा प्रभारी अधिकारी यांच्यासह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here