दशनाम गोसावी समाज्याला न्याय मिळावा – कैलासभाऊ गोसावी

0

गोसावी समाज्याला न्याय मिळावा – कैलास गोसावी मनमाड – दफन भूमीसाठी 15 गुंठे जागा मिळूनही फक्त कागदोपत्री आहे ,ती समाजाला देण्यासाठी प्रशासन नगरपालिका उडवाउडवीची उत्तरे देत आहे, गेली 14 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित विषय आहे, अल्प समाज असल्यामुळे अन्याय होत आहे. एखाद्या समाजबांधव मृत्यू झाला तर त्याला जाण्यासाठी रस्ताही नाही, काटेरी झाडे , लाईट नाही, खदानी मध्ये जिथे बेवारस रेल्वे कटिंग ,मृत झाला असेल तर त्याला अर्धवटच स्थितीत दफन केले जाते .त्याठिकाणी आम्हा समाजातील लोकांना व महिला, वयस्कर व लहान-मोठ्या लेकरांना समाज बांधवांना जाऊन आम्हाला तिथे दफनभूमीच्या विचित्र व भयावह परिस्थिती जाऊन अंत्य संस्कार करावे लागतात, त्यामुळे अनेक जण अंत्यसंस्कारासाठी येण्यासाठी टाळाटाळ करतात येत ही नाही, भर दिवसा तिथे कोणी येण्याची हिम्मत ही करत नाही,अनेक पुरावे प्रशासनास देऊन नगरपालिकेच्या अनेक पाठ पुरावा केला आहे, आता काय ते उग्र स्वरूपाचे आंदोलनाची करण्याची आमच्यावर वेळ आली आहे. आमच्यासाठी व आमच्या समाजासाठी समाज बांधवांसाठी फार शर्मनाक गोष्ट आहे. ही फार वाईट परिस्थितीत बेवारस जागेत अंत्य संस्कार करावे लागतात असे निवेदनात खंत व्यक्त केली आहे. यावेळी नांदगाव तालुका आमदार सुहास आण्णा कांदे यांना निवेदन देण्यात आले, व समाधी भूमी जागेविषयी त्वरित निर्णय देण्यासाठी, उपस्थित महाराष्ट्र दशनाम गोसावी समाज समाधी बचाव समिती समिती, नांदगाव तालुका जिल्हाध्यक्ष कैलास भाऊ गोसावी, तालुकाध्यक्ष रामनाथ गिरीगोसावी, तालुका संपर्क प्रमुख डॉक्टर शरद गिरीगोसावी, मनमाड शहर कैलास गिरी लाल गिरीगोसावी दीपक गिरीगोसावी, व इतर गोसावी बांधव,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here