
कळवण , नाशिक ( प्रतिनिधी – महेश कुवर) नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्याचे विकासाचे मुख्य केंद्र असलेल्या वसाका ची अंत्यत दुरावास्था होण्याच्या मार्गावर असुन वसाकामधिल सुरक्षा यंत्रना तोकडी पडत आहे सुरक्षा कर्मचाऱ्यांना गत ७ ,८ महीन्यापासुन वेतन नसल्याने ते पुरेशा सक्येने कामांवर येत नसल्याने २८,००० सभासद असलेल्या व ३०० कोटीची स्थावर मालमत्ता असलेल्या वसाकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे ,सन १७/१८ मध्ये धाराशिव या उद्योग समुहाला , महाराष्ट्र राज्य शिखर बॅंक ने स्थानिक लोकप्रतिनि च्या मदतीनें २५ वर्षां साठी भाड्याचे घालावयास दिला आहे सन २०१७/१८ मध्ये कामगारा शी करार करण्यावरुन वाद निर्माण झाले , त्यामुळे हंगाम संपण्या पुर्विच कारखाना बंद पडला ,गत वर्षी धाराशिवच्या संचालक मंडळाने कारखाना सुरू न झाल्याने शेंकडों कामगार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता,अशा परीस्थितीत या वर्षि वसाका सुरू होईल या आशेवर वसाकाचे शेतकरी कामगार आस लावुन बसले आहेतवसाकाच्या स्थानावर मालमत्तेच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र शासना ने सहा महिन्यां पुर्वि अवसायकाची नेमणुक केली ली आहे ,तरी वसाका ची यंत्र सामुग्री सुरक्षित व जैसै ते ठेवण्याची जबाबदारी असुनही मालमत्तेचे नुकसान होत आहे ,सुरक्षा रक्षकांची संख्या मर्यादित असल्या कारणाने व त्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने ते कामांवर येत नाही त्यामुळे त्यांना २४ तास सगळीकडे लक्ष देता येत नसल्याने कारखाना कार्यस्थळावरील दक्षीन बाजुला असलेली अतिशय भक्कम व मजबुत बांधकाम असलेली दगडी संरक्षक भिंत जागोजागी पाडण्यात आली आहे लोखंडाचा वापर करून बांधण्यात आलेली दगडी प्रत्यक्ष पहाणी केल्यावर निर्दर्शनास येते ,सन २०११/१२ मध्ये बांधलेल्या संरक्षक भिंती करीता कोठ्यावधी रूपये खर्च केला असुन तीची अशा पध्दतिने पडझड व मोडतोड बघितल्यावर सभासद व कांमगांराचा संताप अनावर होत आहे एकिकडे वसाकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना कारखाना सुरू करणे साठी कामगारांच्या वतिने शर्तिचे प्रयत्न सुरू आहेत ,धाराशिव कारखाना प्रशासनाने लवकर पुढाकार घेवुन ,कामगार संघटनेशी ,कामगार उपायुक्त यांच्या समोर झालेल्या लेखी चर्चेनुसार त्वरीत करार करुन , कारखाना सुरू करणे साठी पुढे यावे अशी मागणी कामगार संघटने कडुन करण्यात येत असल्याची माहिती वसाका कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक देवरे कार्याध्यक्ष कुबेर जाधव यांनी दिली आहे.
