
मनमाड ( प्रतिनिधी हर्षद गद्रे ) मध्य रेल्वे माध्यमीक व उच्च माध्यमिक विद्यालय शास्त्र विभागाचा निकाल 100 % येथील 98 वर्षे जुन्या व शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या राष्ट्रिय शिक्षण संस्था संचलीत मध्य रेल्वे माध्यमीक विद्यालयाचा 12 परीक्षेचा निकाल 100 %लागला .विद्यालयाने 100 टक्के निकालाची गेल्या कैक वर्षांची परम्परा ह्या वर्षी देखील कायम ठेवली .बैरगी अंकिता अशोक ही विद्यार्थिनी 82 76 %गुण मिळवून पहिली तर आहिरे सायली प्रकाश 82.46% गुण मिळवून द्वितीय तर कातकडे वैष्णवी सूर्यकांत 82.30 % गुण मिळवून तृतीय आली. विद्यालयातील 57 विद्यार्थी डीस्टींक्षन मधे तर 56 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तिर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन एड. किशोर चोरडिया,सचिव राजेंद्र गुप्ता,जेष्ठ संचालक शोभना सप्रे,सुधिर सप्रे,विकास काकडे,व इतर संचालकानी आभिनंदन केले आहे.
