
मनमाड ( प्रतिनिधी- हर्षद गद्रे ) मातृस्मृतिनिमित्त श्री रमाकांत मंत्री यांचेकडून सरस्वती विद्यालयास फवारणी यंत्राची भेट कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळेत सॅनिटायझेशनची सुविधा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. काळाची हीच गरज ओळखून सरस्वती विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष श्री रमाकांत मंत्री यांनी त्यांच्या मातोश्री स्व. श्रीमती कुसुम यशवंत मंत्री यांच्या स्मृतिप्रित्यर्थ फवारणी यंत्र शाळेला भेट म्हणून दिले. यावेळी शालेय समिती अध्यक्ष श्री रमाकांत मंत्री तसेच डॉ. सुनील बागरेचा, शालेय समिती सदस्य श्री गाडगीळ सर, श्री किशोर नावरकर, श्री विकास काकडे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. श्री गाडगीळ सर व डॉ. सुनिल बागरेचा यांच्या हस्ते हे फवारणी यंत्र शाळेला सुपूर्द करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी सर्व शासकीय नियमांचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
