Home Breaking News द्वितीय वर्ष बी. फार्मसी थेट प्रवेश विद्यार्थ्यांसाठी ओळख सत्र (Induction Program) “महिला...

द्वितीय वर्ष बी. फार्मसी थेट प्रवेश विद्यार्थ्यांसाठी ओळख सत्र (Induction Program) “महिला आरोग्य व व्यक्तिमत्त्व विकासावर लक्ष केंद्रित – एसएनपीटीमध्ये इंडक्शन प्रोग्रामचा समारोप”

0

नाशिक : श्री पंचवटी एज्युकेशन सोसायटी “एस.एन.पी.टी. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी”,व द्वितीय वर्ष बी. फार्मसी थेट प्रवेश विद्यार्थ्यांसाठी ओळख सत्र (Induction Program) “महिला आरोग्य व व्यक्तिमत्त्व विकासावर लक्ष केंद्रित – एसएनपीटीमध्ये इंडक्शन प्रोग्रामचा समारोप”
दि. १५ ते १९ सप्टेंबर २०२५ झाला,
“एस.एन.पी.टी. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत” दि. १५ ते १९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत द्वितीय वर्ष बी. फार्मसीसाठी थेट प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ओळख सत्राचे आयोजन करण्यात आले. आज दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी या सत्राचा शेवटचा दिवस होता. हा कार्यक्रम Y-Connect (BrandTouch & Analytics Pvt. Ltd.) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध, माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले. आजच्या सत्राचे मुख्य अतिथी म्हणून डॉ. प्रतिमा करकळे मॅडम (लाईफ स्कील्स ट्रेनर) उपस्थित होत्या. त्यांनी “वैयक्तिक विकास व महिला स्वच्छता (Personality Enrichment and Women’s Hygiene)” या विषयावर मार्गदर्शन केले.त्यांनी आपल्या सत्रात महत्त्वाचे मुद्दे समजावून सांगितले मासिक पाळीतील स्वच्छता व आरोग्याचे महत्त्व, स्वच्छतेच्या सवयी व स्वतःची काळजी घेणे, आत्मविश्वास वाढविणे आणि व्यक्तिमत्त्व घडविणे, जीवनातील अडचणींवर मात करत आत्मसन्मानाने जगणे, “खरी सुंदरता ही अंतःकरणातूनच उमटते”, म्हणून महिलांनी नेहमी स्वच्छ, निरोगी व आत्मविश्वासाने भरलेले असावे त्यानुसार, कोणत्याही परिस्थितीत आपले सर्वोत्तम देण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. या प्रेरणादायी सत्रामुळे विद्यार्थ्यांना वैयक्तिक व सामाजिक पातळीवर सकारात्मक ऊर्जा व मार्गदर्शन मिळाले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी सत्राचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाल्याची माहिती प्राचार्य. डॉ. विशाल गुलेचा यांनी दिली. यावेळी कार्यक्रमासाठी संस्थचे अध्यक्ष मा. श्री. नरेंद्रभाई ठक्कर व उपाध्यक्ष मा. श्री. प्रकाशभाई पटेल, सचिव मा. श्री. देवेंद्र पटेल, फार्मसी विभागाचे सचिव मा. श्री. उपेंद्रभाई दिनानी, उपसचिव मा. श्री. अभयभाई चोकसी व इतर पदाधिकारी यांनी पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here