मुंबई : दिनांक 10 ऑगस्ट रोजी, मिरा रोड, मुंबई येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय द्वारा संचालित ब्रह्माकुमारीज राजयोग मेडिटेशन सेंटरमध्ये रक्षाबंधनाचा पावन कार्यक्रम सायंकाळी उत्साहात पार पडला.या वेळी सुराज कुटे – संस्थापक अध्यक्ष, सुराज्य निर्माण प्रतिष्ठान, यांना केंद्र प्रमुख रंजनबेन दीदी यांनी राखी बांधली. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी दीदीने आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या.या वेळी सुराज कुटे यांनी भावपूर्ण शब्दांत रक्षाबंधन आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम मांडला. ते म्हणाले —“रक्षाबंधन म्हणजे केवळ बहिणीचा भावाच्या हाताला बांधलेला धागा नव्हे, तर आत्म्याला आत्म्याशी जोडणारा पवित्र बंध आहे. ही राखी आपल्याला आठवण करून देते की खरी ‘रक्षा’ तलवार, भिंत किंवा सत्ता करून होत नाही… खरी सुरक्षा होते शुद्ध विचारांनी, निस्वार्थ प्रेमाने आणि परमात्म्याशी असलेल्या अटूट नात्याने.आज आपण राखी बांधताना फक्त एकमेकांना नव्हे, तर या जगाला शांततेची, प्रेमाची आणि सद्गुणांची सुरक्षा देण्याचा संकल्प करूया. जसे हा पवित्र धागा हातावर बांधला जातो, तसेच आपण आपल्या मनावर सत्कल्पनांचे व सद्गुणांचे धागे घट्ट बांधूया.”तसेच त्यांनी पुढे सांगितले की, “रक्षाबंधन हा केवळ एक सण नसून आत्मिक बंध आणि शुद्धतेचा संदेश देणारा दिवस आहे. परमपिता परमात्म्याशी जोडलेले नातेच खरी सुरक्षा देऊ शकते.”कार्यक्रमात गायिका संगीता करजना, अभिनेते प्रशांत छारी, सेलिब्रिटी मॅनेजर सशी लोहारुकर, स्थानिक नगरसेवक हेमाजी सोनी तसेच अनेक प्रतिष्ठित लोक आणि बंधू-भगिनी उपस्थित होते.कार्यक्रमात बहिणींनी राखी बांधून शुद्धता, प्रेम आणि आत्मिक बंधाचे महत्त्व स्पष्ट केले. उपस्थितांना राजयोग ध्यानाची माहिती देत अंतरिक शांती व सकारात्मक जीवन जगण्याचा संदेश देण्यात आला.
( संपर्क – सुराज कुटे -7021264578 )







