Home Breaking News आषाढी एकादशीनिमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या निवासस्थानी दिंडी सोहळा

आषाढी एकादशीनिमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या निवासस्थानी दिंडी सोहळा

0

नांदगाव : आषाढी एकादशीनिमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या निवासस्थानी दिंडी सोहळा पार पडला.
याप्रसंगी आमदार सुहास आण्णा कांदे यांचे चिरंजीव देवा सुहास कांदे यांनी वारकरी वेशभूषा करत या दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला.याप्रसंगी विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था नांदगाव चे वारकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाळ मुदुंगाच्या साथीने राम कृष्ण जरी माऊलीचा गजर झाला, भजने झाली, या वेळी संस्थेचे संस्थापक नंदकिशोर महाराज दौंड यांच्या नांदगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार बाळकृष्ण महाराज बुरकुल जळगाव बुद्रुक शिवाजी महाराज भालूरकर सोमनाथ महाराज तांदळे जीवन महाराज पिंप्राळा, त्र्यंबक बाबा अस्तगाव ज्ञानेश्वर महाराज बोगीर यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात पार पडला.यावेळी आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई सुहास कांदे उपस्थित होते. आषाढी एकादशी निमित्ताने आमदार सुहास अण्णा कांदे यांनी उपस्थित सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
या निमित्ताने सर्व वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here