Home Breaking News आव्हाणे बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन!

आव्हाणे बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन!

0

अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) श्रीक्षेत्र आव्हाणे बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताहात दिनांक २८ एप्रिल ते ५ मे या कालावधीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आव्हाणे बुद्रुक येथे ह.भ.प. केशव महाराज गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत आहे.विणापुजन ह.भ.प.सोमेश्वर महाराज गवळी आणि ह.भ.प.निलेश महाराज वाणी यांच्या हस्ते विणापुजन होणार आहे.सर्व ह.भ.प.अण्णासाहेब महाराज बोरूडे, प्रेमानंद महाराज शास्त्री,उल्हास महाराज सुर्यवंशी, साध्वी आरती ताई शिंदे, निलेश महाराज वाणी, गोरक्षनाथ महाराज बनकर,स्वामी अम्रुतानंद सरस्वती,यांची किर्तने होणार आहेत.रविवार दिनांक ४.५.२०२५ रोजी सायंकाळी चार वाजता दिंडी मिरवणूक होणार आहे.सोमवार दिनांक ५.५.२०२५ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. वारकरी भुषण उमेश महाराज दशरथे यांच्या काल्याच्या किर्तनाने आणि भगवान चोथे, रावसाहेब पंडित, मामा पंडीत आणि प्रविण पाटेकर यांच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता होणार आहे. तसेच खैरे, सोनवणे,पंडीत, दीघे, कळमकर,चोथे,रसाळ, धुमाळ, मुटकुळे, कोळगे, चितळे,नांगरे, गोसावी, मिसाळ या परीवाराच्या वतीने दररोज अन्नदान करण्यात येणार आहे. रामदास कोळगे मेजर, गणेश गोरडे, गणेश शिंपी, सुभाष दीघे, वंदनाताई खैरे, राजेंद्र कोळगे, सुभाष वाणी, मीराबाई चोथे, आशाताई रसाळ, संजय कोळगे,संभाजी खैरे,अनिल खैरे, बाबासाहेब चोथे हे संतपुजन करणार आहेत.ह.भ.प.विनायक महाराज कोळगे हे व्यासपीठ चालवणार आहेत.दररोज पहाटे ५ते६ काकडा भजन, ७ ते११ ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ४ ते ६ ह.भ.प. जालिंदर महाराज निकम यांचे प्रवचन होणार आहे.सायंकाळी ६ ते ७ हरीपाठ, आणि रात्री ९ते११ हरीकिर्तन आणि नंतर हरीजागर या प्रमाणे कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ आव्हाणे येथील भजनी मंडळ व तरूण मंडळ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here