Home Breaking News एसएनपीटी फार्मसी कॉलेजमध्ये ‘कलावेध 2K25’ उत्सवाची शानदार सुरुवात

एसएनपीटी फार्मसी कॉलेजमध्ये ‘कलावेध 2K25’ उत्सवाची शानदार सुरुवात

0

नाशिक – एस. एन. पी. टी. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये ‘कलावेध 2K25′ या बहुप्रतीक्षित वार्षिक महोत्सवाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली. या सांस्कृतिक आणि क्रीडा सोहळ्याचा प्रारंभ भव्य उद्घाटन समारंभाने झाला.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, तसेच महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. या शुभारंभानंतर क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन सोहळा पार पडला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आनंदाने सहभाग घेतला.’जर्सी रिव्हिलिंग’ आणि ‘बलून रिलीझ’ या विशेष उपक्रमांनी वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली. आकाशात झेपावणाऱ्या रंगीबेरंगी बलूनच्या दृश्याने संपूर्ण महाविद्यालय प्रांगणात जल्लोषमय वातावरण निर्माण झाले. यानंतर चॅम्पियनशिप ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले, ज्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या उत्साहाची लाट उमटली.’कलावेध 2K25′ हा उत्सव २४ मार्चपर्यंत चालणार असून, यात विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या भव्य सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. नरेंद्रभाई ठक्कर, सचिव मा. श्री. देवेंद्रभाई पटेल, फार्मसी विभागाचे सचिव मा. श्री. उपेंद्रभाई दिनानी, यांनी शुभेच्छा दिल्या तसेच माननीय सदस्य मा. श्री. राजेशभाई टक्कर, मा. श्री. हर्षदभाई पटेल, मा. श्री. धनेशभाई बटाविया आणि प्राचार्य व्ही. एस. गुलेचा यांच्या उपस्थितीने उत्साह दुगुनीत झाला. तसेच, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि महाविद्यालयाच्या संपूर्ण परिवाराने मोठ्या आनंदात सहभाग घेतला.’कलावेध 2K25′ हा केवळ एक महोत्सव नसून, विद्यार्थ्यांच्या कला, खेळगुण, संघभावना आणि प्रतिभेचे एक उत्सवी दर्शन आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here