Home Breaking News ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के यांच्या काल्याच्या किर्तनाने वै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या पुण्यतिथी सोहळ्याची...

ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के यांच्या काल्याच्या किर्तनाने वै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता

0

अहमदनगर (सुनिल नजन अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी) अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वाघोली येथील वैकुंठवासी सद्गुरू यादव बाबा वाघोलीकर यांच्या पुण्यतिथी सोहळ्याची ह.भ.प.राम महाराज झिंजुर्के यांच्या काल्याच्या किर्तनाने या गौरवशाली ४८ व्या सप्ताहाची सांगता झाली. ह.भ.प.भाउसाहेब महाराज भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१७ ते२५ फेब्रुवारी या कालावधीत या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सर्व ह.भ.प.अंकुश महाराज कादे,महंत बाबागीरी महाराज, स्वामी नित्यानंदगिरीजी महाराज,देविदास महाराज म्हस्के,भागवत महाराज उंबरेकर, अशोक महाराज कोंगे, आळंदी निवासी निव्रुती महाराज मतकर,भालसिंग महाराज वाघोलीकर,यांची किर्तने झाली. नउ दिवस चाललेल्या या अखंड हरिनाम सोहळ्याला पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून या आध्यात्मिक पर्वणीचा लाभ व आनंद घेतला. वै.यादवबाबा वाघोलीकर यांनी घालून दिलेली परंपरा आजही भालसिंग परीवाराकडून कायम राखली जात आहे. रथयात्रे द्वारा पंढरपूर, आळंदी,पैठण,येथे दरवर्षी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.आध्यात्माचा वारसा लाभलेले भालसिंग महाराज वाघोलीकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गावात भरपूर प्रमाणात शिष्यगण तयार करून त्यांना आध्यात्माची गोडी लागावी म्हणून विशेष प्रयत्न केले आहेत. ह.भ.प.अभिमंन्यु महाराज भालसिंग हे वै.यादवबाबा वाघोली कर संस्थानचे कामकाज योग्य नियोजन करून पहात आहेत. या सोहळ्याला पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठ्ठल रुक्मिणी आणि यादवबाबा मंदिरासमोर महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्यातील प्रमुख दिंडी मिरवणूकीसाठी सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here