मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन कारखाना शाखेचे वरिष्ठ पदाधिकारी रविंद्र पगारे हे सेवानिवृत्त झाले.त्यानिमित्तानेअसोसिएशन तर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी झोनल सचिव सतिषभाऊ केदारे, कारखाना शाखेचे सचिव प्रविण अहिरे कारखाना शाखेचे कार्याध्यक्ष किरण अहिरे, कारखाना शाखेचे खजिनदार संदिप धिवर, कारखाना शाखेचे अतिरिक्त सचिव सागर गरूड, कारखाना शाखेचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील तगारे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव किरण वाघ आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पंढरीनाथ पठारे यांनी केले तर आभार प्रदर्शन हर्षद सुर्यवंशी यांनी केले.यावेळी विनोद झोडपे, संदिप धिवर व सत्कारमूर्ती रविंद्र पगारे यांची भाषणे झाली.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रविंद्र पगारे यांच्या सत्कार करण्यात आला.यावेळी सुनील सोनवणे, संदिप नाना पगारे, निखिल सोनवणे,राजू इसमपल्ली, किशोर वानखेडे,विकास अहिरे, राहुल शिंदे, अभ्युदय बागुल, विनोद खरे,सुमित अहिरे, संदिप पगारे, प्रदीप अहिरे,अर्जुन बागुल आदि उपस्थित होते,
Home Breaking News ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन कारखाना शाखेचे वरिष्ठ पदाधिकारी रविंद्र...








