सरकार आणि महसूल विभागाने सर्वोच्च न्यायालयात लेखी देउन प्रकल्प निष्कासित झाल्याच्या आदेशानंतरच कोपरे धरणाच्या जमिनी मुळ मालकांना मिळतील – खा.सुजय विखे

0

अहमदनगर (सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) ‌ अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे, हनुमान टाकळी ते कोपरे शिवारातील (येरडा प्रकल्प) जमिनी मुळ मालकांच्या नावे व्हाव्यात या संदर्भात सन २०१८ पासून सर्वोच्च न्यायालयात एक याचिका प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासन आणि महसूल विभागाने सर्वोच्च न्यायालयात सरकारला या कोपरे धरणाच्या प्रकल्पाची आम्हाला गरज नाही असे लेखी दिल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाने प्रकल्प निष्कासित केल्याच्या निकाला नंतरच कोपरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी मुळ मालकांच्या नावे होतील अशी माहिती अहमदनगर जिल्ह्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली.ते पाथर्डी तालुक्यातील, हनुमान टाकळी,जवखेडे खालसा येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला त्या प्रसंगी बोलत होते.न्यायालयाचा एक निकाल जाहीर करण्यात आलेला आहे की सरकारने एखाद्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या असतील आणि तो प्रकल्प जर पाच वर्षांत पूर्ण झाला नाही तर त्या प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनी मुळ मालकांच्या नावे करण्यात याव्यात असा निकाल जाहीर केलेला आहे तो निर्णय या ठिकाणी लागू होत आहे परंतु काही लोकांनी या संदर्भात थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहे त्यामुळे तोही प्रश्न प्रलंबित आहे.जवखेडे दुमाला ते तिसगाव रस्ता डांबरीकरण, जवखेडे ते कोपरे शिवरस्ता डांबरीकरण या कामाच्या शुभारंभा प्रसंगी बोलत होते.या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे या होत्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते उद्धवराव वाघ हे होते.प्रारंभी जवखेडे खालसा गावचे लोक नियुक्त नवनिर्वाचीत सरपंच चारुदत्त उद्धवराव वाघ यांनी प्रास्ताविक केले.त्यांनी जवखेडे ते देडगाव रस्ता डांबरीकरण, हनुमान मंदिरासमोर सभामंडप आणि इतर कामांची आमदार खासदार यांच्या कडे मागणी केली आहे .प्रारंभी गावातून सर्व पाहुण्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.जवखेडे दुमाला येथेही सोसायटीचे चेरमन कचरू पाटील नेहुल आणि संचालक आदिनाथ गीरी, सचिन नेहुल यांनी खा.विखे -राजळेंचा सन्मान केला.त्यानंतर जवखेडे पंचक्रोशीतील हजारो नागरिकांना विखे पाटील यांच्या हस्ते साखर वाटण्यात आली. याप्रसंगी पाथर्डी बाजार समितीचे सभापती सुभाषराव बर्डे, सुभाष ताठे, भगवान आव्हाड, एकनाथ आटकर, वैभव खलाटे,अजय रक्ताटे,वर्षा गवळी, सुनिता वाघ, पोपटराव आंधळे, कुशिनाथ बर्डे,राजूमामा तागड, सरपंच मंदा कसोटे,प्रतिक खेडकर, साहेबराव गवळी, अण्णा शिंदे, बाबासाहेब सरगड, शिवाजी मतकर, राजेंद्र मतकर, बाळासाहेब कासार, संदिप नेहुल, प्रमोद काकडे, वसंत नेहुल,नुरबाबा शेख,शमशुद्दीन शेख यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक मांन्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. चेरमन चारुदत्त वाघ मित्र मंडळाच्या वतीने प्रिती भोजन देऊन सर्व मांन्यवरांचा सन्मान करण्यात आला.बावीस तारखेला अयोध्येतील राममंदीर उभारणीच्या दिवशी सर्वांनी आपापल्या गावातील हनुमान मंदीरात लाडूचा प्रसाद वाटावा आणि राममंदिर सोहळ्याबाबद आपली क्रुतज्ञता व्यक्त करावी असे आवाहन खासदार सुजय विखे पाटील यांनी केले.आभार अॅडहोकेट वैभवराव आंधळे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here