आमदार राजळेंच्या कासार पिंपळगावात ढाकणे, काकडे, दौंड,वाघ,यांचे नजन परिवाराकडून नविन वर्षात जल्लोषात जोरदार स्वागत!

0

अहमदनगर (सुनिल नजन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांच्या कासार पिंपळगावात नवीन वर्षाचे औचित्य साधत ढाकणे, काकडे, दौंड,वाघ यांनी नजन परिवाराच्या वतीने नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होऊन हजेरी लावल्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पत्रकार सुनिल नजन, अनिल नजन, गणेश नजन, योगेश नजन, ओंकार नजन यांनी सर्व नजन परिवाराच्या वतीने नववर्षाच्या स्वागतासाठी एका खाजगी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमास सर्वच राजकीय पक्षांनी हजेरी लावून आनंदोत्सव साजरा केला. आणि एकमेकांना सुबेच्छा दिल्या.प्रथम कासार पिंपळगावच्या सरपंच सौ. मोनालीताई राहुल राजळे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यांचा नजन परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब राजळे हे आवर्जून उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस आणि केदारेश्वर साखर कारखान्याचे माजी चेरमन प्रतापराव ढाकणे यांनी हजेरी लावून अनिल नजन यांचा सन्मान करत आनंदोत्सव साजरा केला.नजन परिवाराच्या वतीने ही प्रतापकाका ढाकणे यांचा सन्मान करण्यात आला.राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे यांचाही सन्मान करण्यात आला.पाथर्डी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. सुनिता दौंड यांचे पती आणि भाजपाचे युवा नेते गोकुळभाउ दौंड यांचे ही जोरदार स्वागत करण्यात आले.शेवगाव तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद गटात वर्चस्व असलेल्या आणि अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौ. हर्षदाताई काकडे यांचेही जोरदार स्वागत करण्यात आले.त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ योगिता ताई राजळे यांनीही नजन परीवारास सुबेच्छा दिल्या.व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक आणि जवखेडे खालसा सोसायटीचे चेरमन तथा ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच चारुदत्त वाघ यांनाही सन्मानित करण्यात आले.त्यांच्या समवेत युवा नेते अॅडहोकेट वैभवराव आंधळे यांचाही सन्मान करण्यात आला.आदिनाथ नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब बर्डे, हनुमान टाकळी सोसायटीचे माजी चेरमन मोहनराव दगडखैर, विद्यमान व्हाईस चेरमन भाऊसाहेब उघडे, यांनाही सन्मानित करण्यात आले.यावेळी जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये कोपरे गावचे युवा शेतकरी मारुतराव घुले पाटील, अंकुश आव्हाड,दिपक धनवडे, जवखेडे येथील अरुण मतकर, सोमनाथ मतकर, संतोष मतकर, मच्छिंद्र मतकर, विवेक पंडित,पिराजी बुटे, पत्रकार दिपक खोसे, विजय राजळे,कानिफ कर्डिले, बाबासाहेब गावडे, राहुल गावडे, सुभाषराव हंडाळ, जालिंदर तागड, बाळासाहेब धरम, अनिल बारगळ,संपत बुळे, जालिंदर खोसे, लक्ष्मण दातिर,इंद्रभान दातिर,ताके सर, बाळासाहेब कोठुळे, कारभारी शिंदे,चांदा येथील आदर्श माता पुरस्कार मिळालेल्या कस्तुराताई राशिनकर, आशाताईं भुसारी मॅडम, राहुल नजन,यांचा समावेश होता.नजन परिवाराच्या वतीने प्रितीभोजना नंतर नववर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या मांन्यवरांचे मनोरंजन करण्यासाठी बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रुपूर गावातील भागवत मंडलिक आणि बबन वाल्हेकर प्रस्तुत मल्हारी मार्तंड जागरण गोंधळ संगीत रजनीचे ही आयोजन करण्यात आले होते.एकंदरीत (२०२४) या नवीन वर्षाचे नजन परिवाराच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.खाजगी कार्यक्रम असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी हजेरी लावली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here