धनगर समाज आरक्षणासाठी बारामतीच्या कल्याणी वाघमोडेने दिल्लीचे तख्त हलविले

0

अहमदनगर ( थेट दिल्लीच्या जंतरमंतर वरुन सुनिल नजन/ अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी ) संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या (st) आरक्षणासाठी आंदोलनाचा एल्गार पुकारुन वनवा पेटलेला असतानाच बारामतीच्या कल्याणी वाघमोडेने थेट दिल्लीचे तख्त काबीज करत आंदोलन केले आणि धनगर समाज आरक्षणासाठी दिल्लीतील जंतरमंतर परीसर दणाणून सोडला. तेथे भाजप सरकार विरोधात प्रचंड जोरदार घोषणाबाजी करत जंतरमंतर वर आंदोलन गाजवले. कल्याणी वाघमोडे ही धनगर समाजाची खरोखरच वाघिण असल्याचे तीने तीच्या कृतीतून दाखवून दिले आहे.एक महिला असुनही ती अजिबात डगमगली नाही.कल्याणी वाघमोडे सोबत महाराष्ट्रासह दिल्ली, नोएडा, कानपूर, कर्नाटक, मध्यप्रदेश, इंदोर येथील अनेक नेते सहभागी झाले होते.यामध्ये प्रामुख्याने आम जनता पार्टी इंडिया चे अध्यक्ष हरीभाई पटेल, उत्तरप्रदेशचे भाजपचे माजी राज्यमंत्री सतिश पाल,आॅल इंडिया धनगर समाज महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अजयपालसींह होळकर, दिल्लीचे सेवानिवृत्त पोलिस एसीपी सुर्यकांत पाटील, इतिहासकार मधुसूदन होळकर, बारामतीचे धनगर समाजाचे नेते डॉ. सुजीत वाघमोडे,रामप्रकाश होळकर, रमेश देवीसींह वर्मा, खासदार विनायक राऊत, धुळे येथील शिवाजी पाटील, आदित्य भोगे, राजेंद्र देवकर आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माता भगिनी यांचा समावेश होता. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी २०१४ साली लोकसभा निवडणुकीतील प्रचारात धनगर समाजाला पंढरपूर आणि बारामती येथे दिलेल्या आश्वासनांची फोटो सह आठवण करून देण्यात आली.हे सरकार धनगर समाजाचा आरक्षणासाठी चालढकल करीत कसा छळ करीत आहे हे सांगून धनगर समाजाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आरक्षण न दिल्यास लोकसभा निवडणूकीत धनगर समाज भाजपच्या नेत्यांना मतपेटीतून चांगली चपराक देईल असे सर्व नेत्यांनी आपल्या भाषणात सांगितले .महाराष्ट्रातील नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधानमंडळ भवनावर धनगर समाजाच्या वतीने जो मोर्चा काढण्यात येणार आहे.त्यामधे धनगर समाजाने हजारोंच्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन कल्याणी वाघमोडे यांनी केले आहे. (थेट दिल्लीच्या जंतरमंतर तख्तावरून सुनिल नजन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here