पर्यायी दिलेल्या रस्त्याची डागडुजी करा, रस्त्यावर लाईट ची व्यवस्था करा : शिवसेना मनमाड शहर

0

मनमाड : मनमाड शहरातून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील शहराच्या मधोमध असणाऱ्या रेल्वेवर ब्रिजचा काही भाग कोसळल्यामुळे सदरील रस्ता हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने शहराचे दोन तुकड्यात विभाजन झाले आहे त्यामुळे शहरातील या भागाचा आपसातील संपर्क हा तुटलेला आहे. नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, अबाल वृद्धांना अडचण होत आहे. तरी या रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून शहराच्या संपर्कासाठी जे मार्ग निवडले आहेत त्या रस्त्यांच्या सर्वे करून सदरील रस्त्यावरील रहदारीचे अडथळे तसेच रस्त्याची डागडुजी करणे गरजेचे आहे, सदरील मार्ग हे गावाच्या व बाहेरील भागातून जात असल्याने त्यावर लाईटची व्यवस्था करणे हे गरजेचे आहे.या सर्व बाबी अत्यंत गरजेचे असल्याने या आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून यावर त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे अशा आशयाचे निवेदन शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे,उपजिल्हाप्रमुख सुनील हाडगे यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here