अहमदनगर : (सुनिल नजन/ अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने अहमदनगर जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील ९६ महसूल मंडळ दुष्काळ ग्रस्त म्हणून जाहीर केली परंतु सतत दुष्काळ ग्रस्त म्हणून सरकार दप्तरी नोंद असलेल्या पाथर्डी तालुक्यातील काही महसूल मंडळे या यादीतून वगळले असल्याने भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष युवा नेते गोकुळ दौंड यांनी पाथर्डीत उपोषण सुरू केले आहे.त्यांनी संपूर्ण २२२ शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघतील गावे दुष्काळ ग्रस्त म्हणून जाहीर करावीत अशी लेखी मागणी सरकारकडे केली असल्याने संपूर्ण मतदार संघातून त्यांच्या उपोषणाला उत्स्फूर्तपणे सर्व पक्षीय जाहीर पाठींबा मिळत आहे.शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती क्षितीज भैय्या घुले, शेवगाव बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, स्वप्निल देशमुख, शिवाजी नेमाने, नंदकुमार मुंडे,अनिल बंड,चांद मनियार, स्वाभिमानी संघटनेचे रमेश कचरे, बाळासाहेब गर्जे, बाबुराव बांगर, संजय देशमुख, आपचे किसन आव्हाड,बोरूडे, वंचित आघाडीचे किसनराव चव्हाण सर, दादा शिवणकर, सुरेश मुनोत, यांनी पाठिंबा देत स्थानिक लोक प्रतिनिधी आणि सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत प्रचंड घोषणाबाजी करत आक्रमक पवित्रा घेत उपोषणाला सुरुवात केली आहे.या उपोषणाला सर्व पक्षीय पाठींबा मिळत असल्याने शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघात सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण झाले आहे.विषेश करून कोरडगाव महसूल मंडळ दुष्काळ ग्रस्त यादीतून वगळण्यात आल्याने त्या पंचवीस ते तीस गावातील शेतकरी वर्गात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. युवा नेते गोकुळ दौंड यांनी सरकारला निवेदन सादर करूनही सरकारी अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची उपाययोजना न केल्याने हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. जो पर्यंत सरकार संपूर्ण शेवगाव -पाथर्डी विधानसभा मतदारसंघच दुष्काळ ग्रस्त म्हणून जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा इशारा दौंड यांनी सरकारला दिला आहे.
Home Breaking News सत्तेच्या सारीपाटाला सुरुंग लावत शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघात दुष्काळ जाहीर करावा...








