Home Breaking News डिग्रस येथे शिवलीलामृत पारायण सोहळ्यात इंदोरीकर महाराज यांनी केले श्रोत्यांना मंत्रमुग्ध

डिग्रस येथे शिवलीलामृत पारायण सोहळ्यात इंदोरीकर महाराज यांनी केले श्रोत्यांना मंत्रमुग्ध

0

अहमदनगर :(सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा) अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे बिरोबा महाराज यात्रेनिमित्त शिवलीलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.अमोल पिसे, प्रणाली कोकाटे, अमोल गाडे यांची किर्तने झाली.यात्रेनिमीत्त देवाला गंगा जलाभिषेक करण्यात आला. शनिवारी सकाळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामवंत किर्तनकार हे.भ.प.निव्रुत्ति महाराज इंदोरीकर यांच्या काल्याच्या किर्तनाने आणि आधारवेल फौंडेशनच्या अध्यक्षा व अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या मा.सदस्या सौ. वैशालीताई संजय नान्नोर यांच्या काल्याच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता झाली. ह.भ.प इंदोरीकर महाराज यांनी समाजातील अनिष्ट रुढी परंपरेवर प्रहार करत वेगवेगळ्या अभंगाच्या चालीतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.दूपारी बिरोबा मंदिरात भक्तांच्या वाणीतून होईकाचा कार्यक्रम संपन्न झाला. या सोहळ्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील विठ्ठल बिरदेव मंदिराचे मुख्य पुजारी आणि सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक नारायण खाणू मोठेदेसाई हे आवर्जून उपस्थित होते.यावेळी पंचक्रोशीत अनेक भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.वैशालीताई नान्नोर यांनी इंदोरीकर महाराज यांना दिपावली भाऊबीजेच्या निमित्ताने सहभोजन देउन औक्षण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here