Home Breaking News सरकारच्या नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा व योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध...

सरकारच्या नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा व योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे :- डॉ. भारती पवार

0

नाशिक :  नाशिक येथे आयोजित आयुष संवाद कार्यक्रमात पार पडला यावेळी आयुष्मान भारत PMJAY अंतर्गत आयुष्मान कार्ड आणि आभा कार्डचे वाटप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ. भारती पवार यांनी सांगितले की देशातील प्रत्येक वर्गाच्या चांगल्या आरोग्यासाठी केंद्र सरकारने खास योजना आणली आहे. मोदी सरकारने पंतप्रधान जन-आरोग्य योजना म्हणजे आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात केली आहे. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. त्यामुळे गरीब आणि मध्यम वर्गातील लाखो लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत होणार आहे. तसेच रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि डिजिटल स्वरूपात मिळावी म्हणून आभा कार्ड सुरू करण्यात आले आहे. कार्डवर रुग्णांचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या केलेले उपचार आदी माहिती साठविली जाणार आहे.उपचारांसाठी प्रत्यक्ष अहवाल, कागदपत्रे घेऊन जाण्याची आता गरज नाही. मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प केला गरीब कल्याणाचा आणि नुसताच संकल्पचं नाही केला तर तो प्रत्यक्षात आणण्यासाठी जगात कुठली चांगली योजना असेल तर ती प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या माध्यमातून पाच लाखाचा इन्शुरन्स एका ऍशूरन्स माध्यमातून पेशंटला विविध आजारांवरती उपचारासाठी मदत मिळत आहे,प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान कार्ड यांच्याकडे आहे त्यांना नुसतं राज्यात किंवा जिल्ह्यात नाही तर इतर राज्यातील याचा लाभ घेता येणार आहे,यावेळी आमदार सीमाताई हिरे,अक्षय जैन,मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असीमा मित्तल, मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर, मनपा मालेगांव आयुक्त भालचंद्र गोसावी,आरोग्य अधिकारी, सिव्हिल सर्जन, डीएचओ,आरोग्य सेवक,ग्रामपंचायत सरपंच,सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here