Home Breaking News शेवगावात धनगर आरक्षणाचा वनवा पेटला, भव्य आक्रोश मोर्चाने तहसीलदार यांना निवेदन सादर

शेवगावात धनगर आरक्षणाचा वनवा पेटला, भव्य आक्रोश मोर्चाने तहसीलदार यांना निवेदन सादर

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर) अहिल्यादेवीचे जन्म गाव जामखेड तालुक्यातील चौंडी येथे सहा सप्टेंबर पासून धनगर समाजाला एस् टी आरक्षण मिळावे म्हणून यशवंत सेनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी शेवगाव तालुक्यातील धनगर समाजाचे नेते आणि जनशक्ती मंचचे महासचिव नेते जगन्नाथ पाटील गावडे, शेवगाव मार्केट कमिटीचे उपसभापती गणेश खंबरे आणि निव्रुत्त प्रा.विनायक नजन सर यांच्या नेत्रुत्वाखाली या भव्य आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.शेवगावातील खंडोबा मंदिरा पासून डफाच्या तालावर पारंपरिक धनगरी न्रुत्य करीत हा मोर्चा तहसील च्या दिशेने निघाला होता.सरकारने तात्काळ धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा अशा घोषणा देत संपूर्ण शेवगाव शहर दणाणून सोडले होते. घटनेत छत्तीस नंबर ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षण दिले आहे पण राज्यकर्त्यानी व सरकारने धनगर समाजाचा विश्वासघात करत गेली सत्तर वर्षे समाजाला एस् टी आरक्षणा पासून वंचित ठेवले आहे त्याची त्वरित अंमलबजावणी करावी म्हणून हा आक्रोश मोर्चा शेवगावच्या तहसील कार्यालयावर धडकला. नायब तहसीलदार गुरव साहेब यांनी निवेदन स्विकारले. या मोर्चात राजू शिंदे, प्रा.विनायक नजन सर,बाजीराव लेंडाळ,विजय लेंडाळ, आदिनाथ दिंडे,विजय चांडे,ज्ञानेश्वर गावडे, जेष्ठ नेते जगन्नाथ गावडे यांची भाषणे झाली. शालेय विद्यार्थी कार्तिक होळकर, आणि विद्यार्थीनी आरोही डोईफोडे यांनी तडाखेबाज भाषण करीत सरकारने धनगर समाजासाठी एसटी आरक्षणाचा जी आर काढण्याची मागणी केली. प्रा.विनायक नजन सर यांनी थेट विधानसभेलाच घेराव घालन्याचे आवाहन केले. तर जगन्नाथ गावडे यांनी सर्व मतदार संघात धनगर समाजाचे उमेदवार उभे करून प्रस्थापितांना चांगला धडा शिकवण्यासाठी धनगर समाजाने गट-तट सोडून एकत्र होण्याची विनवणी केली. या आक्रोश मोर्चात गणेश कोरडे, सीताराम कुंडकर,लक्ष्मण देवढे,कारभारी नाचन,शंकर भिसे, मच्छिंद्र नजन,मच्छिंद्र कोरडे, सुनिल सुरवसे, अप्पासाहेब वीर,सोमनाथ वीर,निखिल लेंडाळ, बाळासाहेब होळकर, दिपक घोलप,अशोक गावडे, नवनाथ गावडे, हिराजी देशमुख, गणेश होळकर, गणेश ढवाण,कचरू काळे, श्रीधर सुडके,दत्तात्रय वीर,अशोक काळे, भाउसाहेब कोल्हे,सोन्याबापू गिरगुणे,गिताराम वीर,पांडुरंग गाडे,विजय नजन,नानासाहेब पडळकर, राजेंद्र लेंडाळ, रामेश्वर जर्हाड,विनोद निर्मळ, गहिनीनाथ गुंजाळ, रामू गुंजाळ, पांडुरंग दातीर यांच्या सह अनेक गावातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा वनवा आता अहमदनगर जिल्ह्यातून थेट संपूर्ण महाराष्ट्रात पसरणार आहे.सरकारने ल़ोकसभेत विधेयक मंजूर करून घेऊन हा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्याची संपूर्ण धनगर समाजाची मागणी जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here