Home Breaking News केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी :- डॉ. भारती पवार

केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी :- डॉ. भारती पवार

0

राज्य : केंद्र सरकारच्या योजना या जनतेच्या कल्याणासाठी आहेत. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती शहरासह गावपातळीवर शासकीय योजना प्रभावीपणे पोहचविण्याच्या दृष्टीने सातत्याने काम करीत असते. या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, उद्यापासून जिल्ह्यात आयुष्मान भव मोहिम सुरू होत असून 2 ऑक्टोबर 2023 पर्यंत होणाऱ्या सेवा पंधरवड्यात विविध आरोग्य विषयक कार्यक्रम व मेळावे राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेचे 23 लाख लाभार्थी असून त्यापैकी 7 लाख लाभार्थ्यांना कार्ड वितरण झाले आहे. आभा कार्डचे जिल्ह्यात आतापर्यंत 11 लाख वितरण झाले आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये आयुष्यमान भव मोहिमेंतर्गत दर शनिवारी मेळाव्याचे आयोजन होणार असून यात नागरिकांना आजारांच्या चाचण्या व उपचार केले जाणार आहेत. याबाबत शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांपर्यत लाभ पोहचण्याच्या दृष्टीने जनजागृती करावी. त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत कार्ड व आभा कार्ड उर्वरित लाभार्थ्यांना प्रदान करण्यात यावेत. अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी यावेळी दिल्या.
उद्यापासून जिल्ह्यात विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नाशिकमध्ये हा कार्यक्रम साजरा होत आहे. विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून देशातील 13 हजार कोटींचे पॅकेजचा लाभ वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून हस्तकौशल्याने वस्तू बनविणारे कारागीर व शिल्पकार यांना मिळणार आहे.

तसेच आयुष्यमान भव,विश्वकर्मा योजना, जल जीवन मिशन योजना, प्रधानमंत्री सडक योजना, स्वच्छता अभियान अशा वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून रस्ते,पाणी,आरोग्य, वीज आदी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जवळपास 1600 कोटीपेक्षा जास्त निधी नाशिक जिल्ह्याला प्राप्त झाला आहे त्याचा ही आढावा यावेळी घेण्यात आला तसेच रस्त्यांची कामे लवकरात लवकर करावी असे आदेश ही डॉ. भारती पवार यांनी दिले.

यावेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात 4 पिक व्हॅनचे चावी देवून वितरण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरक्ति मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जून गुंडे, मालेगाव महानगरपालिका प्रशासक भालचंद्र गोसावी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरकर,समितीचे अशासकीय सदस्य सुवर्णा ताई जगताप, अरुण माऊली, राहुल केदारे, हितेश पगार यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here