केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पुणे येथील ICMR-NIV ला भेट

0

पुणे : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पुणे येथील ICMR-NIV ला भेट दिली आणि कोझिकोड, केरळ येथे नोंदवलेल्या वर्तमान निपाह व्हायरसच्या उद्रेकाच्या संदर्भात आढावा बैठक घेतली. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि माननीय केंद्रीय आरोग्य मंत्री श्री मनसुख मांडविया जी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकार सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत असे डॉ. भारती पवार यांनी यावेळी सांगितले.सदर बैठकीला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ शिला गोडबोले, डॉ. सारा चेरियन, डॉ. बी.व्ही तांदळे, डॉ. कविता लोले, डॉ व्हीपी बोंद्रे, डॉ अनुराधा त्रिपाठी, डॉ जयती मलिक, डॉ सुनील वैद्य, डॉ प्रज्ञा डी यादव, डॉ गजानन सपकाळ, डॉ अनुकुमार, डॉ योगेश गुरव, डॉ. प्रदिप बर्डे, डॉ. दीप्ती पाराशर, डॉ. मल्लिका लावनिया, डॉ. मनोहर चौधरी यांच्यासह डॉ. अशोक एम, डॉ. रिमा सहाय आणि इतर BSL-4 शास्त्रज्ञ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here